शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी भागवताहेत तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 01:30 IST

नांदूरवैद्य : धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात दरवर्षी नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्याचा सर्वात जास्त त्रास महिलांना होतो. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणाच्या उशाशी असलेल्या नांदूरवैद्य येथील महिलादेखील या पाणीटंचाईपासून सुटल्या नाहीत.

नांदूरवैद्य : धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात दरवर्षी नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्याचा सर्वात जास्त त्रास महिलांना होतो. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणाच्या उशाशी असलेल्या नांदूरवैद्य येथील महिलादेखील या पाणीटंचाईपासून सुटल्या नाहीत. ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे पाच ते सहा महिन्यांपासून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे काम रखडल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. यामुळे नांदूरवैद्य येथील शेतकरी दत्तू शांताराम दिवटे व सागर शांताराम दिवटे या दोन बंधूंनी गावातील महिलांची होणारी कसरत पाहून सामाजिक जाणिवेतून आपल्या शेतीची कामे बाजूला ठेवत दररोज गावाची मोफत तहान भागवित आहेत. यामुळे त्यांचा एक वर्षाचा ग्रामपंचायतीचा कर पूर्णपणे माफ करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.नांदूरवैद्य येथे दरवर्षी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असून, महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी घराबाहेर पडावे लागत असल्यामुळे महिलांना हंडाभर पाण्यासाठी दूरवर जावे लागत होते. नांदूरवैद्य येथील ग्रामपंचायतीच्या नवीन विहिरीचे खोदकाम करण्यास सुरु वात केली असून, आजपर्यंत विहिरीचे काम पूर्ण न झाल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले.यामुळे शेतकरी दिवटे बंधंूनी उदात्त भावनेने त्यांच्या शेतातील पाइपलाइनद्वारे ग्रामस्थांना पाण्याची सोय करून दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी गावातील नागरिकांना पाणी देतेवेळी त्यांच्या शेतातील उभ्या पिकाला पाणी न देता व लाईटबिलाची चिंता केली नाही. यामुळे ग्रामपंचायतीने त्यांच्याकडून येणे असलेला एक वर्षाचा ग्रामपंचायत कर माफ करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.-------------------------नांदूरवैद्य गावात पाणीपुरवठा करणाºया मुख्य विहिरीचे काम रखडल्यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तसेच महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेली वणवण न पहावल्यामुळे आम्ही दोन्हीही बंधूंनी निर्णय घेत एक सामाजिक बांधिलकी या नात्याने गावासाठी शेतीची कामे बाजूला सारून ठेवत शेतीच्या पंपाद्वारे ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी सोय केली.- दत्तू व सागर दिवटे, शेतकरी, नांदूरवैद्य 

टॅग्स :Nashikनाशिक