शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

खतांच्या कृत्रिम टंचाईने शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:06 IST

निफाड तालुक्यातील सर्वत्र पेरण्या आटोपल्या असून, मका, सोयाबीनसह अनेक पिकांच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी शेतकरी युरिया खताचा वापर करीत असतात; परंतु सद्य:स्थितीत बाजारपेठेत युरिया उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांवर भटकंतीची वेळ आली आहे. अनेक कृषिसेवा केंद्रांवर चकरा मारूनही शेतकऱ्यांना युरिया व इतर खते मिळत नसल्याने ते हतबल झाल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देसायखेडा : निफाड तालुक्यातील कृ षिसेवा केंद्रांच्या तपासणीची मागणी

सायखेडा : निफाड तालुक्यातील सर्वत्र पेरण्या आटोपल्या असून, मका, सोयाबीनसह अनेक पिकांच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी शेतकरी युरिया खताचा वापर करीत असतात; परंतु सद्य:स्थितीत बाजारपेठेत युरिया उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांवर भटकंतीची वेळ आली आहे. अनेक कृषिसेवा केंद्रांवर चकरा मारूनही शेतकऱ्यांना युरिया व इतर खते मिळत नसल्याने ते हतबल झाल्याचे दिसून येत आहे.

मागील काही दिवसातच बाजारपेठेतून युरिया अचानक गायब कसा झाला कसा, याबाबत तर्क-वितर्कलावले जात असून, भविष्यात युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करून काळ्या बाजारात वाढीव दराने खते विकण्याचा फंडा तर वापरला जात नाही ना, अशा प्रकारची शंका शेतकºयांच्या मनात घर करत आहे. शेतीसाठी युरिया अत्यावश्यक वस्तू असून त्यावर सरकारचे आणि कृषी विभागाचे कठोर नियंत्रण असणे आवश्यक आहे; परंतु सध्याच्या स्थितीत जवळपास सर्वच कृषी केंद्र दुकानातून युरिया हद्दपार असल्याने शासनाचे याकडे लक्ष नाही काय, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.अनेक दुकानदार खते साठवून ठेवतात व कृत्रिम टंचाई निर्माण करून नंतर चढ्या दराने विक्र ी करतात. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांनी कठोर भूमिका घेऊन अशा दुकानदारांवर कडक कारवाई केली तर खताची टंचाई निर्माण होणार नाही.- रामा राजोळे, शेतकरी संघर्ष संघटनासोयाबीन, मका तसेच नगदी पिके बहरली असून, वाढीच्या काळात रासायनिक खतांची गरज आहे; मात्र अनेक दिवसांपासून युरिया व इतर खते मिळत नाहीत. त्यामुळे पीक हातातून जाण्याची वेळ आली आहे. शासनाने तत्काळ खते उपलब्ध करून द्यावे.- नवनाथ कमानकर, शेतकरी

टॅग्स :Farmerशेतकरी