शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या वावरामुळे शेतकरी भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 19:23 IST

खेडलेझुंगे : येथे उसाची लागवडी खालील शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने मागील वर्षापासुन ग्रामस्थांना बिबट्याचा वारंवार वावर आढळुन आल्याने येथील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

ठळक मुद्देखेडलेझुंगे : शेतीला पाणी देण्याकरीता जातात गटा गटाने

खेडलेझुंगे : येथे उसाची लागवडी खालील शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने मागील वर्षापासुन ग्रामस्थांना बिबट्याचा वारंवार वावर आढळुन आल्याने येथील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.पाळीव कुत्रे, जनावरांवर हल्ले झालेले आहे. त्यातच येथील बोरमाथा वस्तीत वास्तव्यास असलेले योगेश साबळे यांच्या गट नंबर ४६३ मध्ये कांदा पिक काढल्यानंतर शेतात मेंढ्याचा कळप बसविलेला आहे.बुधवारी (दि.१०) मध्यरात्री ३ च्या सुमारास बिबट्याने शेळी आणि घोड्यावर हल्ला करून त्यांना मृत्युमुखी पाडले. दुपारी उशिरापर्यंत वन विभागाचे संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक विजय टेकणर यांनी घटनास्थळी भेट देवुन पंचनामा केला.बिबट्याने मानवी वसाहतीजवळ असलेल्या मेंढ्यांच्या कळपावर केलेल्या हल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झालेले आहे. शेतकरी वर्ग सकाळी उशीरा घराच्या बाहेर पडणे पसंत करत आहेत.शेतामध्ये काम करणे येथील शेतकऱ्यांना जिकीरीचे झालेले आहे. दिवसा उन्हाचा तडाखा असल्याने शेतामध्ये सायंकाळी किंवा पहाटे जीव मुठीत धरु न पाणी देण्याचे कामकाज ४-५ शेतकरी एकत्र येवुन करत आहेत. परंतु विज कंपनीकडुन शेती पंपांसाठी रात्रीच विजपुरवठा केला जात असल्याने येथील शेतकऱ्यांपुढे पीक जगविण्याचे मोठे आव्हान निर्माण झालेले आहे.विज वितरण विभागाने दिवसा शेतीपंपासाठी वीज द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडुन होत आहे.परिसरामध्ये नेमके किती बिबट्यांचा वावर आहे हे नक्की सांगता येत नसल्याने शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. वन विभागाने परिसरामध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन परिसरामध्ये पिंजरे लावुन येथील शेतकरी वर्गाला भयमुक्त करावे.- विजय गिते,माजी उपसरपंच, खेडलेझुंगे.येथील परिसरात शेती कामासाठी शेतकरी व कामगार शेती कामास येण्यासाठी टाळाटाळ करत आहे. जादा दराने बाहेरु न कामगार उपलब्ध करावे लागत आहे. तसेच नुकत्याच झालेल्या हल्यामुळे रहीवाशी व शेत कामगार भयभीत झालेले आहे. यापुर्वी वन्यप्राण्यांकडुन मानवी वसाहतीजवळ असे प्राणघातक हल्ले झालेले नव्हते. आज रोजी येथील जनजीवन विस्कळीत होत आहे. तरी वन विभागाने कर्मचारी वाढवुन शेतकºयांना सहकार्य करावे.- योगेश साबळे, शेतकरी.