शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावी कांदा लिलाव बंद पाडत शेतकऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 12:47 IST

लासलगाव : केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी तातडीने रद्द करावी यासह इतर मागण्यांसाठी शुक्रवारी येथील बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अर्धा तास लिलाव बंद पाडत प्रवेशद्वारावर आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले.

लासलगाव : केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी तातडीने रद्द करावी यासह इतर मागण्यांसाठी शुक्रवारी येथील बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अर्धा तास लिलाव बंद पाडत प्रवेशद्वारावर आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले.राज्यातील कांदा उत्पादक शेतकºयांकडे अत्यल्प कांदा शिल्लक असून, बाजारात आवक मंदावल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याच्या दरात सुधारणा झाल्याने शेतकºयांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र कांद्याचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप सुरू केला आहे.त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह राज्यातील सर्वच ठिकाणच्या कांदा उत्पादकांमध्ये अस्वस्थता पसरली असून शेतकरी संतप्त झाले आहेत. केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यात बंदी तातडीने रद्द करावी तसेच परदेशातून कुठलाही प्रकारचा कांदा आयात करू नये, कांदा व्यापाºयांवरील कांदा साठवणूकीचे निर्बंध उठवावे व किमान निर्यातमूल्य कायमस्वरूपी रद्द करून निर्यात सुरू करून शेतकºयांना आर्थिक न्याय द्यावा अशी मागणी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी लासलगाव येथे झालेल्या आंदोलनात केली.मागील काही दिवसांपासून राज्यातील व देशातील विविध राजकीय पक्षांनी व संघटनांनी कांदा भाव वाढीविरोधात आंदोलने करून कांदा बाजारभाव पाडण्याचे काम सुरू केले आहे. दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर शुक्र वारी सकाळी नऊ वाजता सुमारे अर्धा तास कांदा लिलाव बंद पाडून कांदा भाव वाढीला विरोध करणाºया सर्वच राजकीय पक्ष व संघटना यांच्या विरोधात, कांद्याच्या निर्यात बंदी विरोधात तसेच सरकार घेत असलेल्या विविध शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.या प्रसंगी कांदा उत्पादक शेतकरी शैलेंद्र पाटील यांनी सांगितले की, सरकारने कांदा दर कमी करण्याचा हट्ट चालवला आहे.एकहाती सत्तेमुळे केंद्र सरकार अती करण्याचा प्रयत्न करत आहे.कांदा बाजारभाव पाडण्याचा हस्तक्षेप सरकारने वेळीच थांबवावा.सध्या शेतकºयांमध्ये प्रचंड असंतोष आहे.जर असे शेतकरी विरोधी निर्णय केंद्र सरकारने मागे घेतले नाही तर कांदा उत्पादक राज्यस्तरीय आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे शेतकºयांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक