शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

‘शेतकऱ्यांवरील कारवाई अन्यायकारक

By admin | Updated: January 30, 2016 22:23 IST

’येवला : पिण्याच्या नावाखाली शेतीला घरघर

येवला : शेतीच्या पाण्यासाठी निर्माण केलेली धरणे आता पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित होऊ लागल्याने परिसरातील शेती व्यवसायाला घरघर लागली आहे. शेती जगविण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्याची चोरी करण्यास शासन भाग पाडत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शासनाने स्वतंत्र पाइपलाइनद्वारे व्यवस्था करावी, परंतु शेतकऱ्याला पाणीचोर ठरवून केली जाणारी कारवाई अन्यायकारक असल्याचे शेतकरी नेते अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.हक्काचे पाणी शेतकऱ्याला मिळत नाही व लाखो रु पये खर्च करून पिके जळत आहेत. त्यामुळे शेतकरी पाणीचोरी करणारच ही परिस्थिती शेतकऱ्याला सहन न झाल्यास अखेर ताकदीच्या जोरावर पाणी घेतल्याशिवाय शेतकरी स्वस्थ बसणार नाही. करंजवन १७०० दलघफू, पालखेड १५० दलघफू, ओझरखेड व वाघाड यामधील शेतीसाठी आरक्षित साठा एवढे सारे पाणी असताना एप्रिल व जूनमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन मिळणार आहे. तरीही शेतकऱ्यांनी पाणी चोरले, अशी हाकाटी पिटली जात आहे. हे योग्य नाही. साठवण तलाव होण्याअगोदर १९९६ पूर्वीपासून या परिसरात शेती फुलविली जाते आहे. छोटे-मोठ्या बागाही उभ्या केल्या गेल्या; परंतु सध्या पिण्याच्या पाण्याची ओरड करून येथील शेतकऱ्यांच्या वीजपंपाचे कनेक्शन तोडणे, मोटारी जप्त करणे हा उद्योग अयोग्य असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले आहे. शेतपंपाचे वीज कनेक्शन तोडणे ही कृती असमर्थनीय असून, पाण्याचे महत्त्व अधोरेखित करून पाण्याचा भाव वाढविण्याची चर्चादेखील परिसरात आहे. हजार रुपये भावाचा डोंगळा पाच हजारांवर गेल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. या साऱ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीशिंदे यांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)