शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याने साकारले शेतोपयोगी यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:40 IST

येवला : तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शेतकरी अनिल भोरकडे यांनी कपाशी, मका, सोयाबीन या पिकांमध्ये फवारणी, पेरणी, पाळी, कोळपणी, ...

येवला : तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शेतकरी अनिल भोरकडे यांनी कपाशी, मका, सोयाबीन या पिकांमध्ये फवारणी, पेरणी, पाळी, कोळपणी, खुरपणी या आंतरमशागतीसाठी मिनी ट्रॅक्टर यंत्र तयार केले आहे. सदर यंत्राचे उद्घाटन पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते व तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, पंचायत समिती कृषी अधिकारी वास्ते, कृषी सहाय्यक आहेर, डॉ. सुरेश कांबळे यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. खरिपात प्रामुख्याने मका, कपाशी व सोयाबीन पिके घेतली जातात.यंत्रासाठी लागणाºया साहित्याची कोपरगाव, येवला, राहाता व अहमदनगर येथून शोधाशोध करून जुळवाजुळव केली. सुटीच्या दिवशी शेतातील कामं करून राहिलेल्या वेळेत यंत्राचं काम सुरू झालं आणि दोन-तीन महिन्यात यंत्र तयार झाल. सदर यंत्राचे पहिले प्रात्याक्षिक आपल्याच शेतात घेतले. ते यशस्वी झाल. या यंत्रासोबत वखर, फन व बळी साहित्य असून, त्याद्वारे कपाशी, मका या पिकांत वखर, फन व औषध फवारणी करता येते. सदर यंत्रासाठी यांना साधारणत: २८ ते ३० हजार रुपये खर्च आला.- अनिल भोरकडे, शेतकरी, पिंपळगाव जलालपिकांची खुरपणी मजुरांअभावी घरीच करावी लागते व अंतरमशागतीसाठी बैलांची गरज भासते. अनिल भोरकडे यांच्याकडे बैलजोडी नाही. आताच्या परिस्थितीत चांगल्या बैलजोडीला ६० ते ७० हजार रु पये लागतात व बैलजोड ठेवलीच त्यांच्या सोड-बांध व चारा-पाण्याचा प्रश्न येतो. मग यावर उपाय काय, असा विचार करताना भोरकडे यांना सोशल मीडियावर यंत्र बघण्यात आले.यावर पिटर इंजिनवर चालणारी अनेक प्रकारची यंत्र त्यांनी पाहिली. लहानपणापासून यंर खोल-फिटिंगची खूप आवड असल्याने अशा प्रकारचं यंत्र घरी तयार करता येईल का, असा विचार भोरकडे यांचे डोक्यात आला. घरात १ जून पिटर इंजिन होत ते वापरून त्यांनी प्रयोग करायला सुरु वात केली.

टॅग्स :Nashikनाशिक