शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
3
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
4
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
5
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
6
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
7
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
8
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
9
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
10
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
11
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
12
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
13
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
14
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
15
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
16
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
17
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
18
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
19
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
20
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'

शेतकऱ्यास रोखपालाकडून मारहाण

By admin | Updated: January 5, 2017 01:38 IST

मालेगाव : पत्रकार परिषदेत धक्कादायक प्रकार उघड

मालेगाव : पत्नीच्या आजारपणासाठी व घर खर्चासाठी बॅँक शाखेतुन पैसे काढण्यास गेलेल्या शेतकऱ्याला बॅँक आॅफ महाराष्ट्राच्या करंजगव्हाण शाखेच्या रोखपालाने (कॅशीयर)ने बुटाने मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी तालुक्यातील दहिदी येथील सोपान बाजीराव वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपबिती कथन केली. तब्बल तीन दिवस बॅँक शाखेत हेलपाटे मारुनही रक्कम मिळाली नाही त्यामुळे रोखपाल अभिजित बोरसे यांना तातडीने निलंबीत करावे अशी मागणी वाघ यांनी केली आहे.तालुक्यातील दहिदी येथील सोपान वाघ व त्यांची पत्नी निर्जला वाघ यांचे दोघांचे खाते करंजगव्हाण येथील बॅँक शाखेत आहे. सोपान वाघ यांनी त्यांच्या खात्यावरुन दोन हजार रुपये काढले होते. २ जानेवारी रोजी त्यांची पत्नी निर्मला वाघ यांच्या खात्यावरुन पैसे काढण्यासाठी वाघ ११ वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंत रांगेत उभे होते. त्यानंतर जेवणाची सुट्टी झाल्यामुळे बॅँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बॅँकेचे व्यवहार बंद ठेवले होते. अर्ध्या तासानंतर व्यवहार सुरळीत झाले. मात्र रोकड संपल्याने वाघ यांना टोकण देण्यात आले व दुसऱ्या दिवशी ३ जानेवारीला बॅँकेत या असे सांगण्यात आले. ३ जानेवारीला वाघ बॅँक शाखेत गेले असता त्यांच्या आधी ११ क्रमांकाचे टोकन दिलेल्या खातेदाराला रोखपालाने पैसे अदा केले मात्र वाघ यांना रांगेत उभे राहण्यास सांगितले. वाघ यांनी रितसर रांगेत क्रमांक लावला. क्रमांक आल्यावर बॅँकेच्या रोखपालाने वाघ यांना तुमच्या पत्नीची सही घेऊन या असे सांगितले. वाघ हे पाच किलो मीटर घरी जाऊन आजारी असलेल्या पत्नीची सही घेतली. त्यानंतर बॅँकेत पोहचले असता रोखपालाकडे स्लीप दिली. त्यावेळी रोखपाल अभिजित बोरसे यांनी आता पत्नीला घेऊन या असे सांगितले. यावर वाघ यांनी त्यांना जाब विचारला असता त्यांनी त्यांच्या दालनातुन बाहेर निघुन वाघ यांना बुट हाणून मारला. तसेच इतर कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की केली. (प्रतिनिधी)