शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

माणिकपुंज धरणात शेती पंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 16:25 IST

नांदगाव: संभाव्य पाणी टंचाईच्या भीषणतेकडे तालुकास्तरावरील प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र निर्माण झाले असून नांदगाव तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा नजीकच्या काळातला एकमेव स्त्रोत असलेल्या माणिकपुंज धरणात आज५० पेक्षा अधिक शेती पंप बिनिदक्कत सुरु आहेत.

ठळक मुद्देमाणिकपुंज धरणाची क्षमता ४९५ द.ल.घ.फु. असून यंदा सप्टेंबर महिन्यात फक्त २२५ द.ल.घ.फु. पाणी त्यात होते. नाग्या साक्या धरणाची क्षमता ५०० द.ल.घ. फु. असून त्यात सध्या मृत साठा म्हणजे अवघे ५०द.ल.घ. फु. पाणी आहे.

नांदगाव:संभाव्य पाणी टंचाईच्या भीषणतेकडे तालुकास्तरावरील प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र निर्माण झाले असून नांदगाव तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा नजीकच्या काळातला एकमेव स्त्रोत असलेल्या माणिकपुंज धरणात आज५० पेक्षा अधिक शेती पंप बिनिदक्कत सुरु आहेत. यावर एकाही यंत्रणेचे नियंत्रण नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गेल्या महिन्यात या संदर्भात नांदगाव येथील टंचाई बैठकीत दिलेले आदेश धाब्यावर बसविण्यात आल्याने नांदगावकरांना (तालुक्याला) पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.गेल्या महिन्यात धरणाच्या भिंती जवळील वीज पंपांवर कारवाई केल्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्यात आला नाही. म्हणून पंप धारकांनी जोमाने धरणातले पाणी उपसण्यास सुरवात केली आहे. कारवाई करतांना फोटो सेशन करून चमकोगिरी करणारे महसूल प्रशासनातले तालुकास्तरीय अधिकारी त्यानंतर तिकडे फिरकले नाहीत आता आपले काही होत नाही म्हणून पंप धारकासह जलसंपदा व वीज वितरण कंपनीच्या संगनमताने पाणी उपशाने जोर धरला असून जलपातळी खाली जाऊ लागली आहे.वीज वितरण कंपनीचे सर्व्हिस कनेक्शन्स आहेत.. तसेच आहेत. धरणात ठिकठिकाणी २०० लिटरचे ड्रम तरंगताना दिसून येतात. त्यांना ड्ढह्म्ड्डष्द्मद्गह्ल करून पाण्यात सोडून दिले आहेत. दिवसा एचडीपीईचा काळा पाईप ड्रमसोबत तरंगतांना दिसतो. रात्री चार नटांच्या सहाय्याने तो जोडून, दिवसां लपवलेल्या स्टार्टरच्या तीन वायर्स जोडून रात्री २वाजेपासून सकाळी ७वाजेपर्यन्त पंप पाणी उपसण्याचे काम करत असतात. माणिकपुंजच्या मुख्य भिंती शेजारी असलेले पंप तहसीलदार भारती सागरे यांनी काढले होते. त्याला महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला.येथे होणाऱ्या पाणी उपशा संदर्भात तालुक्यातील काही नेत्यांनी प्रांत भीमराज दराडे यांची भेट घेऊन चिंता व्यक्त केली आहे. वीज पुरवठा बंद केल्याचे अधिकारी जाहीर करतात. पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते.पाणी उचलण्याच्या अनिधकृत प्रक्रि येमुळे धरणाच्या खालच्या बाजूला असलेल्या शेतकरी वर्गात असंतोष वाढत असून ‘त्यांना पाणी मग आम्हाला का नको ’ असा सुर निघू लागल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची नांदी सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. सुरु असलेला पाण्याचा उपसा तातडीने बंद करण्यात यावा अशी मागणी नागरिक करत आहेत. असलेले पाणी पिण्यासाठी राखले नाही तर उन्हाळ्यात रेल्वेने पाणी आणून लातूर सारखी परिस्थिती उदभवण्याची शक्यता यापूर्वीच जाणकारांनी वर्तविली आहे.माणिकपुंज धरणाची क्षमता ४९५ द.ल.घ.फु. असून यंदा सप्टेंबर महिन्यात फक्त २२५ द.ल.घ.फु. पाणी त्यात होते.नाग्या साक्या धरणाची क्षमता ५०० द.ल.घ. फु. असून त्यात सध्या मृत साठा म्हणजे अवघे ५०द.ल.घ. फु. पाणी आहे.कासारी गळमोडी ५ द.ल.घ.फु.