शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

देवदर्शनासाठी गेलेले कुटुंब अद्यापही बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:43 IST

देवदर्शनासाठी गेलेल्या पंचवटीतील गौडा कुटुंबीयांचा गेल्या पाच दिवसांपासून संपर्क होत नसल्याने त्यांचे नातेवाइक चिंतेत आहेत़ दरम्यान, पोलिसांनी तपासाचे चके्र फिरविले असून औरंगाबाद मार्गावरील टोलनाके तपासणी केली जात आहे़

ठळक मुद्देधक्कादायक : सर्वांचे मोबाइल बंद

पंचवटी : देवदर्शनासाठी गेलेल्या पंचवटीतील गौडा कुटुंबीयांचा गेल्या पाच दिवसांपासून संपर्क होत नसल्याने त्यांचे नातेवाइक चिंतेत आहेत़ दरम्यान, पोलिसांनी तपासाचे चके्र फिरविले असून औरंगाबाद मार्गावरील टोलनाके तपासणी केली जात आहे़ हिरावाडीमधील बनारसीनगर येथील पाच व्यक्तींचे कुटुंब आंध्र प्रदेशात देवदर्शनासाठी निघाले मात्र त्यांचा कुणाशीही संपर्क होऊ शकलेला नाही़याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हिरावाडीमध्ये असलेल्या बनारसीनगर येथील गौडा कुटुंब खासगी इंडिका मोटारीने (एम.एच १५डी.एम २६६४) आंध्र प्रदेश राज्यात देवदर्शनाकरिता सोमवारी (दि.१३) राहत्या घरातून दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास निघाले; मात्र ते अद्यापपावेतो घरी परतले नसल्याने हरिष गौडा यांचा मित्र अशोक गौडा (३५,रा.बनारसीनगर) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात हरिष गौडा व त्यांच्या आई नाजुडामा (६०) पत्नी सुधा गौडा (३५), पूजा गौडा (१५), दिया गौडा (११) हे बेपत्ता झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.गौडा कुटुंब देवदर्शनासाठी मोटारीने निघाले; मात्र त्यांचा पुन्हा संपर्क झाला नाही. चार दिवस उलटूनही ते न परतल्याने शेजारी राहणाऱ्या मित्राने पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.संपूर्ण कुटुंब घरातून निघून गेले; मात्र त्यांचा अद्याप कुठेही पत्ता लागला नसून मित्राने हरिष यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला; मात्र त्यांच्याशी कुठलाही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे गौडा यांनी पोलिसांकडे धाव घेतली. अचानकपणे बेपत्ता झालेल्या या कुटुंबाचा शोध घेण्याचा प्रयत्न पंचवटी पोलीस करत आहेत; मात्र अद्याप त्यांचा कुठलाही थांगपत्ता लागू शकलेला नाही. तक्रारदार अशोक यांनी त्यांच्या नातेवाइकांकडेही याबाबत चौकशी केली असून, ते कोणाकडेही थांबले नसल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी तक्रार करून संबंधित कुुटुंबाचा शोध घेण्याचे गाºहाणे मांडले आहे. मोटारीचा क्रमांक, मोबाइल क्रमांकावरून पंचवटी पोलीस या कुटुंबाचे ‘लोकेशन’ मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत; मात्र अद्याप पोलिसांच्या प्रयत्नांनाही यश आलेले नाही.औरंगाबादपर्यंत मागमिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद मार्गे गेलेले गौडा कुटुंबीयांची गाडी औरंगाबाद टोलनाक्यावरून पुढे गेल्याची माहिती हाती लागली आहे़ याशिवाय गौडा यांनी अलिकडेच पंचवटीत बिअरबार व्यवसाय सुरू केला असून, त्याचीदेखील पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMissingबेपत्ता होणं