शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

ताणतणाव दूर करण्यासाठी कौटुंबिक संवाद गरजेचा : आनंद नाडकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:24 IST

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम माणसाच्या व्यक्तिगत जीवनाबरोबरच कौटुंबिक जीवनावर झाला आहे़ या बदलामुळे माणसाचा कुटुंबासमवेत संवाद हरपला असून, तो अधिकाधिक ताणतणावग्रस्त होत चालला आहे़ हा ताणतणाव दूर करून सुखी जीवन जगायचे असेल तर कौटुंबिक सुसंवाद, आध्यात्मिक दृष्टिकोन व सत्य स्वीकारण्याची मानसिकता गरजेची असल्याचे प्रतिपादन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केले.

नाशिक : बदलत्या जीवनशैलीचा परिणाम माणसाच्या व्यक्तिगत जीवनाबरोबरच कौटुंबिक जीवनावर झाला आहे़ या बदलामुळे माणसाचा कुटुंबासमवेत संवाद हरपला असून, तो अधिकाधिक ताणतणावग्रस्त होत चालला आहे़ हा ताणतणाव दूर करून सुखी जीवन जगायचे असेल तर कौटुंबिक सुसंवाद, आध्यात्मिक दृष्टिकोन व सत्य स्वीकारण्याची मानसिकता गरजेची असल्याचे प्रतिपादन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केले.मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटतर्फे महाकवी कालिदास कलामंदिरात रविवारी (दि़२८) आयोजित करण्यात आलेल्या ‘आनंद रहा, निरोगी जगा’ या कार्यक्रमात ते बोलत होते़ डॉ.सुधीर संकलेचा व वैशाली बालाजीवाले यांनी विचारलेल्या प्रश्नांवर डॉ़ नाडकर्णी व डॉ़ मनोज चोपडा यांनी मनाचे व्यापार, मानसिक ताण-तणाव, आजारपण यावर विश्लेषण करून आनंदी जीवनाचे रहस्य उलगडून दाखविले. माणूस हा भौतिक सुखाच्या मागे लागल्याने मानसिक ताण-तणाव वाढले आहेत़  व्यसनाधिनता, ताणतणाव चिंता या समस्यांवर नातेसंबंधातून मिळणारा आधार हे प्रभावी औषध असून, जवळच्या व्यक्तींशी मनमोकळा संवाद, छंदामध्ये स्वत:ला गुंतवणे तसेच डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक असल्याचे नाडकर्णी यांनी सागितले़ प्रारंभी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, विनिता सिंघल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले़ याप्रसंगी आमदार देवयानी फरांदे, डॉ.कैलास कमोद, डॉ. रश्मी चोपडा, प्रशांत हिरे, डॉ. राज नगरकर आदि उपस्थित होते़डॉक्टरांवरील हल्ले होतील कमी...रुग्ण, नातेवाईक व डॉक्टर या तिन्ही घटकांनी वास्तव परिस्थितीचा स्वीकार करणे गरजेचे आहे़ डॉक्टरांना रुग्ण व नातेवाइकांचा आधार खूप महत्त्वाचा असतो, रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना डॉक्टरांनी वास्तव परिस्थितीची माहिती दिली व त्यांनी सहकार्य केले तर डॉक्टरांवरील हल्ले नक्कीच कमी होतील, असे डॉ़ नाडकर्णी यांनी सांगितले़

टॅग्स :docterडॉक्टरHealth Tipsहेल्थ टिप्स