शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब प्रबोधन ही काळाची गरज :  मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:52 IST

स्वातंत्र्यलक्ष्मी राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीच्या गोळे कॉलनीतील समिती कार्यालयास सरसंघचालक मोहन भागवत यांनी भेट दिली. मातृशक्तीची प्रतिष्ठा जपत असताना कुटुंब प्रबोधन आवश्यक असल्याचे मत या भेटीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

नाशिक : स्वातंत्र्यलक्ष्मी राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीच्या गोळे कॉलनीतील समिती कार्यालयास सरसंघचालक मोहन भागवत यांनी भेट दिली. मातृशक्तीची प्रतिष्ठा जपत असताना कुटुंब प्रबोधन आवश्यक असल्याचे मत या भेटीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.यावेळी भागवत यांनी, जगत-जननी, प्रकृती पुरुष ही निसर्गरचना आहे. आपल्या संस्कृतीची सर्वजण समान अशी भावना आहे. अनेक परकीय आक्रमणांनी ती लोप पावली. कुटुंबसंस्था संरक्षण करण्यासाठी कुटुंबप्रबोधन करण्याची गरज आहे, असा विचार समितीच्या सेविकांसमोर मांडला. सरसंघचालकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी संस्थेत देवी अष्टभुजेचे दर्शन घेतले. सभागृहात लावलेली प्रदर्शने बघितली. संस्थेच्या ज्येष्ठ सभासद भानूताई गायधनी यांनी संस्थेच्या वतीने राणी लक्ष्मीबाई यांची प्रतिमा देऊन सत्कार केला. याप्रसंगी माजी आमदार निशिगंधा मोगल यांनी मनोगत व्यक्त केलेसंस्था परीचय शोभा गोसावी यांनी करून दिला. गीता कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील राष्ट्रसेविका समितीच्या शाखेबद्दल माहिती दिली. अ‍ॅड. शोभा गोसावी यांनी प्रतिष्ठानची माहिती सांगितली. गीता कुलकर्णी यांनी नाशिक जिल्ह्यातील कामाची माहिती दिली. विद्या चिपळूणकर, डॉ. शुभांगी कुलकर्णी, मंगला सौंदाणकर आदी उपस्थित होत्या.महिलांसाठी कार्यरत केंद्रराणी लक्ष्मी भवन १९५८ पासून महिला उद्योग केंद्र चालविले जात आहे. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह, लहान मुलांसाठी बालवाडी, पाळणाघर सुद्धा चालविले जाते. त्याशिवाय महिलांसाठी भजनी वर्ग, पौराहित्य वर्ग घेतले जातात. सेवा कार्य म्हणून रु ग्णोपयोगी साहित्य केंद्र व सहायता निधी, शैक्षणिक निधी सहायता आणि अन्नदान योजना कार्यरत आहे. संस्थेतर्फे नाशिक जिल्ह्यातील शौर्य दाखविणाºया महिलेला दरवर्षी महिला शौर्य पुरस्कार दिला जात असल्याचीही माहिती यावेळी भागवत यांना देण्यात आली.

टॅग्स :FamilyपरिवारMohan Bhagwatमोहन भागवत