शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांच्या प्रश्नांकडे काणाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:30 IST

केंद्रातील व राज्यातील भारतीय जनता पार्टीचे सरकार झोपेचे सोंग घेऊन शेतकºयांच्या प्रश्नांकडे काणाडोळा करत आहेत. उद्योजकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज एनपीएत टाकून त्यांना सवलती देत आहेत. मात्र शेतकºयांचे कर्ज माफ करण्यास पैसे नाहीत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यातील अनेक मुद्दे सरकार विसरले आहे.

निफाड : केंद्रातील व राज्यातील भारतीय जनता पार्टीचे सरकार झोपेचे सोंग घेऊन शेतकºयांच्या प्रश्नांकडे काणाडोळा करत आहेत. उद्योजकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज एनपीएत टाकून त्यांना सवलती देत आहेत. मात्र शेतकºयांचे कर्ज माफ करण्यास पैसे नाहीत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यातील अनेक मुद्दे सरकार विसरले आहे.शेतकºयांच्या प्रश्नाबाबत सरकार झोपेचे सोंग घेत आहे. सरकारची झोप उडविण्यासाठी देशातील शेतकरी संघटना सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे २७ सप्टेंबरला हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी निफाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येत्या २७ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थित निफाड तालुक्यातील कोठुरे येथे सायंकाळी ६वा हल्लाबोल मेळाव्याचे आयोजन केले आहे.  या मेळाव्याच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकºयांच्या बैठका आयोजित केल्याचे यावेळी हंसराज वडघुले यांनी सांगितले. ते म्हणाले, सरकार तोड-फोडीचे राजकारण करत आहे. तूर खरेदीत शेतकºयांना कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला आहे. कांदा खरेदीतही व्यापाºयावर दबाव आणत आहेत. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव पाचशे ते सहाशेनी घसरले आहेत.  निफाड व रानवड कारखान्याचे कर्ज माफ करून ते पुन्हा सुरू झाले पाहिजे, शेतकºयांचे संपूर्ण कर्ज माफ झाले पाहिजे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार हमीभाव मिळाला पाहिजे, शेतकºयांची सक्तीची कर्ज वसुली थांबविली पाहिजे या व इतरही अनेक मागण्या शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी व त्यासाठी मोठ्या प्रमाणात लढा उभारण्यासाठी हल्लाबोल मेळाव्याचे आयोजन केले असल्याने मेळावा यशस्वी करण्याचे आवाहनही वडघुले यांनी केले. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, जिल्हा सरचिटणीस सोमनाथ बोराडे, युवा निफाड तालुकाध्यक्ष नितीन कोरडे, सोमनाथ मोरे, सुधाकर मोगल उपस्थित होते.भारतीय जनता पार्टीचे केंद्रातील व राज्यातील सरकार हे उद्योगपतींचे आहे. अंबानी व अदानीसारख्या उद्योगपतींना कोट्यवधी रु पये माफ करून त्यांचे वसूल पात्र कर्ज एनपीएमध्ये टाकून त्यांना सवलत देत आहेत. शेतकºयांना उद्ध्वस्त करून समृद्धी महामार्गाचा घाट घातला जात आहे. शेतकºयांचे संघटन मोडीत काढण्यासाठी त्याच्यावर लोकशाही मार्गाने आंदोलन करताना खोटे गुन्हे दाखल करत आहेत.