शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

मान्यतेच्या बेडीत ‘लॉकअप

By admin | Updated: September 20, 2016 00:49 IST

इंदिरानगर पोलीस ठाणे : अधिकारी, कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी

’संजय शहाणे ल्ल इंदिरानगरयेथील पोलीस ठाण्यातील लॉकअपला अद्यापही मान्यता मिळाली नसल्याने सदर लॉकअप शोभिवंत वस्तू बनली आहे. लॉकअप मान्यतेचा अद्याप प्रस्ताव मांडला नसल्याने अधिकारी व कर्मचारी वर्गास अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.इंदिरानगर परिसरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारीमुळे इंदिरानगरसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. त्यासाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटना व नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने, निवेदने दिली. यानंतर जनतेच्या भावनांची कदर करीत स्वतंत्र पोलीस ठाण्याला मंजुरी दिली. १ एप्रिल २0१0 ला इंदिरानगर पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. इंदिरानगरला स्वमालकीची इमारत बांधून तयार न झाल्याने तीन वर्षांच्या भाडेतत्त्वावर राजीवनगर झोपडपट्टीच्या लगत असलेल्या एका अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये पोलीस स्टेशन सुरू करण्यात आले होते. एका फ्लॅटमध्ये सुरू करण्यात आलेल्या पोलीस ठाण्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांसह विविध विभागास स्वतंत्र व्यवस्था आणि लॉकअपअभावी मोठी गैरसोय झाली होती. त्यामुळे स्वमालकीच्या जागेच्या शोधात असताना सुमारे ४३ वर्षांपूर्वी पोलिसांच्या वाहन दुरुस्तीसाठीच्या ताब्यात घेतलेल्या जागेचा शोध २0११ मध्ये लागला. त्यामुळे स्वमालकीच्या जागेत नूतन इमारतीचा मार्ग मोकळा झाला होता. तसेच संशयित गुन्हेगारांना भद्रकाली, अंबड, नाशिकरोड आदि पोलीस ठाण्यात ने-आण करण्यासाठी होणारी अडचण दूर होणार होती. पोलीस ठाण्याच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच कालावधीपेक्षा सुमारे दीड वर्षानंतर पोलीस ठाण्याचे काम पूर्ण झाले. या भागात विविध गुन्हे घडत असतात आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती वाढत आहेत. त्यामुळे पोलिसांनी संशयित गुन्हेगारांना पकडल्यानंतर त्यांच्या चौकशीसाठी अटक करण्यात येते तेव्हा गुन्हेगारांना लॉकअपमध्ये ठेवण्यासाठी भद्रकाली, अंबड किंवा नाशिकरोड येथे ने -आण करावी लागते. त्यामुळे वेळ लागतो. तसेच ने-आण करताना गुन्हेगार पळून जाण्याची शक्यता टाळता येत नाही. त्यासाठी इंदिरानगर पोलीस ठाण्यास लॉकअपला मंजुरी मिळणे आवश्यक आहे. (वार्ताहर)झोपडपट्टी भागात अनेक वेळा कोम्बिंग दि. १ एप्रिल २0१६ रोजी पोलीस ठाण्याचा लोकार्पण सोहळा झाला होता. परंतु अद्यापपर्यंत लॉकअपला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कारण इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडाळागाव, सावित्रीबाई झोपडपट्टी, अण्णा भाऊ साठेनगर, पिंगुळबाग, राजीवनगर झोपडपट्टी आदि भागात अनेक वेळा पोलिसांनी कोम्बिंग व आॅल आउट आॅपरेशन राबविले आहे.