शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

साकोरेतील मुर्ती दृष्टांतामुळे सापडल्याचा दावा फोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 01:39 IST

नांदगाव तालुक्यातील साकोरे येथे खोदकामात सापडलेल्या तेराव्या शतकातील प्राचीन मूर्ती भगवान आदिनाथ यांनी स्वप्नात दिलेल्या दृष्टांतानुसार सापडल्याचा संबंधीतांचा दावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने खोडून काढला आहे

नाशिक : नांदगाव तालुक्यातील साकोरे येथे खोदकामात सापडलेल्या तेराव्या शतकातील प्राचीन मूर्ती भगवान आदिनाथ यांनी स्वप्नात दिलेल्या दृष्टांतानुसार सापडल्याचा संबंधीतांचा दावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने खोडून काढला आहे. अंनिसचे जिल्हा प्रधान सचिव उदयकुमार कुºहाडे व जिल्हा कार्यवाह महेंद्र दातरंगे यांनी सोमवारी (दि़१६) पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली़गंजमाळ येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना कुºहाडे यांनी सांगितले की, साकोरे येथील संतोष कासलीवाल या इसमाने गत दहा वर्षांपासून भगवान आदिनाथ हे स्वप्नात येऊन दृष्टांत देत होते, असे दावा केला होता़ ११ जुलै २०१८ रोजी झालेल्या दृष्टांतानुसार त्यांनी गुरुवारी (दि़१२) पहाटे गावातील नदीकिनारी खोदकाम केल्यानंतर भगवान आदिनाथ यांच्या इ़स़ १३३६ मधील दोन प्राचीन मूर्ती मिळाल्या़ या मूर्तींनी तीन वेळा रंग बदलल्याचा दावाही कोतवाल यांनी केला़ होता. या मूर्तींची गावातून मिरवणूक काढून मुनिश्री भूविसागर यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून त्या जैन मंदिरात ठेवण्यात आल्या आहेत. आणखी २१ मूर्ती निघणार असल्याचे भाकीतही याबाबतीत कोतवाल यांनी केले होते़  दरम्यान, अंनिसचे राज्य सरचिटणीस शहाजी भोसले, प्रशांत कांबळे तसेच उदय कुºहाडे हे चमत्काराचे सत्यशोधन करण्यासाठी रविवारी (दि़१५) साकोरे येथे गेले होते़ त्यांनी मूर्ती सापडलेले ठिकाण व मूर्तींची पाहणी केल्यानंतर १३३६ साली मराठी भाषा नसतानाही या मूर्तींवरील मराठी लिखाण तसेच जमिनीपासून एकदम वर मिळालेल्या मूर्ती पहाता हे ठरवून केलेले कृत्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले़ यानंतर त्यांनी संदीप कोतवाल व त्यांच्या पत्नीशी मूर्तींच्या रंग बदलण्याबाबत चर्चा केली असता दोघांच्या बोलण्यामध्ये साम्य आढळले नाही़ अंनिसच्या कार्यकर्त्यांनी कोतवाल यांना जादूटोणा कायद्यानुसार हा अजामीनपात्र गुन्हा असल्याचे निदर्शनास आणून देताच सदर बनाव आपणच रचल्याचे कबुल केल्याचा दावा अंनिसने केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक