शहरं
Join us  
Trending Stories
1
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
2
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
3
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
4
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
5
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
6
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
7
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
9
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
10
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
11
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
12
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
13
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
14
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
15
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
16
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
17
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
18
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
19
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
20
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."

आठवड्यात कांदा भावात घसरण

By admin | Updated: July 23, 2014 00:31 IST

आठवड्यात कांदा भावात घसरण

पिंपळगाव बसवंत : केंद्र सरकारने कांद्याला जीवनावश्यक वस्तूत समावेश करून निर्यातमूल्य ३०० वरून ५०० रुपये केल्यापासून कांद्याला उतारती कळा लागली आहे. गेल्या आठ दिवसांत कांद्याची ५०० रुपयांनी घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.कांद्याचा बाजारभाव वाढण्याची शंका वाटू लागताच केंद्र सरकारने कांद्यावर निर्बंध घातला. जीवनावश्यक वस्तूत समावेश करून कृषी प्रधान देशाचा बळीराजाला घरचा अहेर दिला. निर्यातमूल्य ३०० वरून ५०० गेले. त्यातच व्यापारी रेल्वे भाववाढीचा फटका शेतकऱ्यांच्या मुळावरच बसला असून, मागील सप्ताहात कांद्याला २५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत होता. सरासरी १९०० ते २००० पर्यंत मिळत होता. चालू सप्ताहात कांद्याला २२०० ते २२५०पर्यंत मिळत असून, सरासरी १९०० पर्यंत मिळत आहे. चार महिने साठवून ठेवलेला माल त्यातच गारपिटीने नुकसान झालेला कांद्याला बाजारभाव मिळेल हा हेतू बाळगून शेतकरी आशावादी होता. मात्र, आठ दिवसांची घसरण घेतल्यावर आर्थिक संकट कोसळणारी ठरत आहे.पाकिस्तानचा कांदा अमृतसर बाजार समितीमध्ये दाखल झाला असून, मलेशिया, बांगलादेश या देशातूनही कांदा येण्याची भीती व्यापारीवर्गाला असून, त्यातच सोशल मीडियाची कांद्यावर केलेली पकड ही शेतकरी, व्यापारी व बाजार समित्यांना मारक ठरत आहे. कांद्याला सरकार का महत्त्व देते, शेतकरीवर्गांना अडीअडचणीतून दोन पैसे मिळत आहे. त्यातच केंद्राचे शेतकऱ्याबाबत धोरण चुकीचे ठरत असल्याने कांद्याचा बाजारभाव कमी होत आहे.(वार्ताहर)