शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कांदा भावात घसरण

By admin | Updated: February 8, 2017 00:21 IST

येवला : शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

येवला : येथील व अंदरसूल उपबाजार समितीत दररोज ५० ते ६० हजार क्विंटल कांद्याची आवक होत असल्यामुळे भावात सातत्याने घसरण होत आहे. शासन कांद्याबाबत कधी गंभीर होणार, हाच प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत. सत्ता मिळाल्यावर उत्तर प्रदेशात कर्जमाफी करू या घोषणेबाबत खिल्ली उडविताना, महाराष्ट्रात सत्ता आहे तेथे अगोदर कर्जमुक्ती आणि कांद्याला भाव द्या, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत लाल कांद्याची आवक दुप्पट झाली होती. दर वर्षी आवक वाढतच आहे. यंदा भाव निम्म्याने घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नोटाबंदीमुळे आधीच मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीच भर पडली आहे. शेतकऱ्यावर बुरे दिन आल्याची प्रतिक्रिया बाजार समितीच्या आवारात सोमवारी व्यक्त झाली.  निर्यातदारांना प्रोत्साहनपर अनुदान देऊन निर्यात वाढवावी. कांद्याला आलेली अवकळा थांबवावी. महाराष्ट्रासह भारतात अन्यत्र मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादित होतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या कांद्याला जोरदार मागणी आहे. कांदा पिकाबाबत निर्यातमुक्त धोरण राबविण्याची गरज आहे. नोटाबंदीचा निर्णयदेखील कांद्याला मारक ठरत आहे. (वार्ताहर )