सायखेडा/खेडलेझुंगे : वातावरणातील सततच्या बदलांमुळे शेती करणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जी पिके सहज आणि कमी खर्चात यायची ती आजच्या वातावरणातील दैनंदिन बदलामुळे खर्चिक झाली आहेत. मागील महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात फुलोºयात असलेल्या द्राक्षबागांना अवकाळी पावसाने झोडपल्यानंतर मागील आठवड्यापासून वाढलेल्या थंडीच्या लाटेमुळे द्राक्ष बागाईतदारांच्या संकटात आणखीनच भर पडलेली आहे. वाढत असलेल्या थंडीचा द्राक्षासह इतर फळबागा भाजीपाल्यांना फटका बसू लागला आहे.नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसाने फुलोºयात असलेल्या द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केलेले होते. द्राक्षबागांमध्ये पाणी साचल्याने अनेक बागांमधील तयार घड सडून गेले. खोडमुळ, बुरशीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने दिवसरात्र औषधांची फवारणी करावी लागल्याने शेतकºयांवर आर्थिक संकट आले होते. परिसरातील सर्वच बागांना अवकाळीचा फटका बसल्याने तलाठी, कृषी विभागातील कर्मचारी आणि ग्रामसेवक यांच्या मार्फत नुकसानींचेपंचनामे करण्यात आलेले होते. परंतु नुकसानभरपाई अजूनही शेतकºयांना मिळालेली नाही.अवकाळीच्या संकटातून वाचलेल्या काही द्राक्षबागांना आता थंडीने गाठले असून, मागील आठवड्यापासून तापमान घसरत असल्याने याचा परिणाम द्राक्षबागांवर होऊ लागलेला आहे. तापमानात विलक्षण प्रमाणात घट होत असल्याने थंडीचा प्रकोप जाणवू लागला आहे.संरक्षणासाठी यलो ट्रॅप पेपरवाढत्या थंडीने द्राक्षबागेवर डावणी, भुरी, तुडतुडे व मिलिबग याचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यासाठी संरक्षण म्हणून द्राक्षघडांना यलो ट्रॅप पेपर लावण्यात आले आहे. यंदा जास्त पाऊस झाल्याने शेतीच्या परिसरात तापमान कमी असतानाच ते आणखी खाली गेल्याने द्राक्षमण्यांना तडे जात आहे. तसेच याचा परिणाम द्राक्षांच्या फुगवणीवर होऊ लागला आहे. भुरी रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होतो. एकूणच बदललेल्या हवामानामुळे द्राक्षांच्या दर्जा गुणवत्तेवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.मण्याची वाढ खुंटलीच्पारा खाली घसरल्याने द्राक्षमण्यांच्या फुगवणीवर परिणाम जाणवू लागला असून, मण्यांची वाढ खुंटली आहे. तयार मण्यांना थंडीने तडे जात आहेत. मुळावर परिणाम होऊन याचा परिणाम झाडावर दिसून येत आहे. थंडीमुळे द्राक्षबागातील निर्धारित तापमान कायम ठेवण्यासाठी प्रमाणात पाणी देणे व शेकोटी पेटविणे तसेच रोगांना रोखण्यासाठी औषधांची फवारणी करणे अशी कामे शेतकºयांना करावी लागत आहेत. सक्रि य नसलेल्या मुळांना सक्रि य करण्यासाठी शेतकरीवर्गाने तज्ज्ञांचे मार्गदर्शनाने पाणी द्यावे किंवा इतर उपाययोजना करणे आवश्यक आहे.
घसरत्या पाऱ्याची डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:27 IST
वातावरणातील सततच्या बदलांमुळे शेती करणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जी पिके सहज आणि कमी खर्चात यायची ती आजच्या वातावरणातील दैनंदिन बदलामुळे खर्चिक झाली आहेत. मागील महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात फुलोºयात असलेल्या द्राक्षबागांना अवकाळी पावसाने झोडपल्यानंतर मागील आठवड्यापासून वाढलेल्या थंडीच्या लाटेमुळे द्राक्ष बागाईतदारांच्या संकटात आणखीनच भर पडलेली आहे. वाढत असलेल्या थंडीचा द्राक्षासह इतर फळबागा भाजीपाल्यांना फटका बसू लागला आहे.
घसरत्या पाऱ्याची डोकेदुखी
ठळक मुद्देद्राक्षबागांना फटका । खर्च निघणेही अवघड झाल्याने उत्पादक हवालदिल