शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

शहरात मुलींच्या जन्मदरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:24 IST

शहरात गेल्या वर्षी एप्रिलमध्ये दर हजारी मुलांमागे असलेले मुलींच्या जन्मदराचे प्रमाण १२०० इतके होते. ते मार्च २०१८ मध्ये घसरून ९२१ वर आले आहे. एकीकडे शहरात महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत प्रसूतिपूर्व लिंगनिदानविरोधात मोहीम राबविली जात असताना मुलींच्या जन्मदरात झालेली घसरण चिंतेची व मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.

नाशिक : शहरात गेल्या वर्षी एप्रिलमध्ये दर हजारी मुलांमागे असलेले मुलींच्या जन्मदराचे प्रमाण १२०० इतके होते. ते मार्च २०१८ मध्ये घसरून ९२१ वर आले आहे. एकीकडे शहरात महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत प्रसूतिपूर्व लिंगनिदानविरोधात मोहीम राबविली जात असताना मुलींच्या जन्मदरात झालेली घसरण चिंतेची व मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.  महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी २०१७ मध्ये एप्रिल महिन्यात मुलींचा जन्मदर १२०० पर्यंत जाऊन पोहोचलेला होता. परंतु, मार्च २०१८ मध्ये जन्मदर ९२१ वर आला आहे. जानेवारी २०१८ मध्ये मुलींचा जन्मदर दरहजारी मुलांमागे ९३७, फेबु्रवारीत ९६७ तर मार्च २०१८ मध्ये ९२१ इतका घसरला आहे. वाढत्या स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रसूतिपूर्व निदानतंत्र कायदा १९९४ लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार, प्रसूतिपूर्व लिंगनिदान करणे कायद्याने गुन्हा आहे. महापालिकेमार्फत सदर कायद्यानुसार, सातत्याने मोहीम राबवत अनधिकृत सोनोग्राफी सेंटरवर नजर ठेवली जाते. काही महिन्यांपूर्वी महापालिकेने सातपूरमधील एका डॉक्टरने चक्क इनोव्हात सोनोग्राफी सेंटर सुरू केल्याचा प्रकार उघडकीस आणला होता. मोहिमेनंतरही शहरात दर हजारी मुलांमागे मुलींचा जन्मदर घसरल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Womenमहिला