शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिका-यांच्या नावाने बनावट संदेश व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 01:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक - कोरोना काळात काळजी घेण्यासंदर्भात नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या नावाने पुन्हा एक बनावट मॅसेज सोशल ...

ठळक मुद्देप्रशासनाचे स्पष्टीकरण: वृत्तपत्र हेच कोरोनाकाळातील खरे मित्र

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक - कोरोना काळात काळजी घेण्यासंदर्भात नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या नावाने पुन्हा एक बनावट मॅसेज सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यात कोरोना विषयी भीती आणि अत्यंत गैरसमज पसरविणारी माहिती आहे. त्यामुळे अशा बनावट मॅसेज मधील आवाहनांना बळी पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. विशेषत: शासन- प्रशासन आणि जनता यांच्यात दुवा साधण्याचे काम वृत्तपत्र करीत आहेत. त्यामुळे कोरोना काळात हेच खरे मित्र असल्याचे ही प्रशासनाच्या पत्रकात म्हंटले आहे.‘कलेक्टरकडून सूचना’ अशा आशयाचा संदेश जिल्हा माहिती कार्यालयांच्या नावाने नाशिकसह विभागातील अहमदनगर, धुळे, जळगांव, नंदुरबार या जिल्'ांत व्हाट्स अ­ॅप व सोशल मीडियाच्या माध्यमातून काही समाजकंटक लोक पसरवत आहेत. त्यात प्रामुख्याने आपल्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तु बंद करणे, त्यांच्या हाताळणी, बाळगणे व काळजी घेण्याबरोबरच वृत्तपत्रांबाबत देखील संभ्रम निर्माण करणारी माहिती पसवरली जात आह. वृत्तपत्रा संदर्भातअशास्त्रीय व अशुद्ध, निराधार माहिती देण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने देखील वृत्तपत्र ही पूर्णपणे सुरक्षित आणि कोरोनामुक्त असल्याचे सांगितले आहे.या संकटकाळात माणसांमध्ये सकारात्मक जाणिवा निर्माण करण्याचे काम देखील ते करत आहेत. वृत्तपत्र हेच समाजाचे मित्र आहेत. माझे कुटूंब व माझी जबाबदारी मोहिमेत जबाबदार कुटूंबाचे घटक म्हणून आफवांना बळी न पडता वृत्तपत्र नियमित वाचायला हवीत, असे आवाहन नाशिक विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक रणजितसिंह राजपूत यांनी केले आहे.यापूर्वी लॉकडाऊन काळात अशाच प्रकारे जिल्हाधिका-यांच्या नावाने बनावट मॅसेज व्हायरल झाल्याने यासंदर्भात पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आली. त्याचा शोध सुरू असून आताही अशाच प्रकारे पुन्हा बनावट संदेश व्हायरल होत असल्याने जिल्हा प्रशासनाने हे प्रकरण गांभिर्याने घेतले आहे.

 

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयCrime Newsगुन्हेगारी