शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लष्कर भरतीच्या बनावट जाहिरातीने तरुणांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:58 IST

लष्कराच्या देशभरातील युनिट््समध्ये विविध पदांची भरती असल्याची जाहिरात व्हॉट््सअ‍ॅपवर फिरल्यामुळे देशभरातील हजारो तरुण देवळालीकॅम्प आर्टिलरी सेंटर येथे भरतीसाठी आले होते. कॅम्पमध्ये आल्यानंतर अशाप्रकारची कोणतीही भरती नसल्याचे स्पष्टीकरण लष्काराने दिल्यानंतर आलेले तरुण निराश होऊन परतले.

देवळाली कॅम्प : लष्कराच्या देशभरातील युनिट््समध्ये विविध पदांची भरती असल्याची जाहिरात व्हॉट््सअ‍ॅपवर फिरल्यामुळे देशभरातील हजारो तरुण देवळालीकॅम्प आर्टिलरी सेंटर येथे भरतीसाठी आले होते. कॅम्पमध्ये आल्यानंतर अशाप्रकारची कोणतीही भरती नसल्याचे स्पष्टीकरण लष्काराने दिल्यानंतर आलेले तरुण निराश होऊन परतले.  देवळालीतील टीए बटालीयनमध्ये ४४ जागांची भरती प्रक्रि या होणार असल्याचे संदेश सोशल मीडियावर फिरल्यामुळे राज्यभरातून हजारो युवक शुक्रवारी देवळालीत दाखल झाले होते. आर्टिलरी सेंटरमध्ये आल्यानंतर अशी कोणतीही भरती नसल्याची माहिती त्यांना मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या संदर्भात काही तरुणांशी संवाद साधला असता त्यांनी भरतीची बनावट जाहिरात मोबाइलवर फिरत असल्याचे दाखविले. सोशल मीडियाच्या माध्यमातून वर्षभरात दुसऱ्यांना अशा प्रकारची जाहिरात आल्याने हजारो तरुणांच्या भावनेशी खेळ खेळला जात आहे. या जाहिरातीमध्ये देशभरातील बेळगाव, बेंगळुरू,देहरादून, कोल्हापूर, नागपूर, देवळाली, तामिळनाडू, कानपूर, सिकंदराबाद या ठिकाणी डिसेंबर १७ ते एप्रिल १८ या दरम्यान जी. डी. सोल्जर व क्लार्क या पदांसाठी एकूण ३७९ जागेसाठी भरती होणार असल्याचे दर्शविण्यात आले आहे. देवळालीतील टीए भरतीकरिता १७ ते ३१ मार्च दरम्यान ४४ जागांसाठी राज्यातील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, बुलढाणा, बीड, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, परभणी यांसह विविध जिल्ह्यातील हजारो युवक देवळालीत दाखल झाले होते. मात्र धोंडीरोड टीए बटालियनच्या कार्यालयात भरतीची चौकशी केली असता अशी कोणतीही भरती या कार्यालयाकडून केली जात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक