शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा युक्रेनवर भयंकर हल्ला! ४० क्षेपणास्त्रे, ४०० ड्रोन हल्ल्यात चार ठार, २० जण जखमी
2
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीत ४५ किलो शुद्ध सोन्याचा वापर; किंमत सुमारे ५० कोटी
3
मणिपूरमध्ये बंदी घातलेल्या संघटनांच्या आठ दहशतवाद्यांना अटक; शस्त्रे, दारूगोळा जप्त
4
बँकांना २.५ लाख कोटींची संजीवनी; कर्जांची सोय; अर्थव्यवस्थेत तरलता आणण्यासाठी निर्णय
5
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
6
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
7
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
8
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
9
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
10
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
11
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
12
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
13
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
14
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
15
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
16
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
17
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
18
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
19
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
20
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख

मेळा स्थानक; समस्यांचे आगर

By admin | Updated: December 2, 2015 22:14 IST

मेळा स्थानक; समस्यांचे आगर

नाशिक : मेळा बसस्थानकाचे नूतनीकरण होण्याचे वारंवार सांगितले जात असले तरी दिवसेंदिवस समस्येच्या गर्तेत अडकणाऱ्या या स्थानकाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे चित्र आहे. शहरातील सर्वांत जुने स्थानक म्हणून मेळा बसस्थानक ओळखले जाते. पूर्वी याच स्थानकातून शहरासाठी आणि बाहेरगावच्याही गाड्या सोडल्या जात होत्या. परंतु पर्यायी बसस्थानके निर्माण झाल्यानंतर या स्थानकाकडे एस.टी. महामंडळाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. स्थानकाच्या बाजूला प्रचंड कचरा पडलेला आहे. त्यातच जवळच स्वच्छतागृह असल्याने तेथील फुटलेल्या पाइपलाइनचे पाणी कचऱ्याभोवती जमा होते. त्यातून आणखीच दुर्गंधी पसरते. स्थानकात प्रवेश केल्यानंतर लगेच या कचऱ्याचे दर्शन होते. दुसऱ्या बाजूला झाडांची सावली असलेल्या ठिकाणी बसण्यासाठी सीमेंट कॉँक्रीटचे कठडे तयार करण्यात आले होते. हे कठडे आता पूर्णपणे तुटलेले आहेत. झाडाभोवती असलेल्या सीमेंट कॉँक्रीटचा ओटादेखील तुटल्याने प्रवाशांना सावलीत बसता येत नाही. या ठिकाणचा ताबा मद्यपी आणि गर्दुल्यांनी घेतल्याने प्रवाशांना येथे थांबणेही मुश्कील झाले आहे. पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने टवाळखोरांनी येथे अड्डा बनविला आहे.अलीकडे तर अनेक नोकरदारवर्ग बसस्थानकाच्या आवारात आपल्या दुचाकी उभ्या करून निघून जातात. यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. पिण्याच्या पाण्याचीदेखील पुरेशी सोय या ठिकाणी नाही. असलेल्या पाणपोईचीदेखील दुरवस्था झालेली आहे.