मनमाड : गोदान एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मनमाड रेल्वेस्थानकावर या गाडीचे इंजिन बदलून गाडी मुंबईकडे मार्गस्थ झाली. या तांत्रिक बिघाडमुळे गाडी तब्बल एक तास मनमाड रेल्वेस्थानकावर रखडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर गोदान एक्स्प्रेस (क्र. ११०५५) या गाडीला मनमाडला थांबा नाही. भुसावळ येथूून निघालेली ही गाडी मनमाड रेल्वेस्थानकाजवळ आल्यानंतर इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची बाब चालकाच्या निदर्शनास आली. त्यामुळे थांबा नसताना सदर गाडी मनमाड रेल्वेस्थानकात थांबविण्यात आली. रेल्वेच्या तांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिघाड काढण्यासाठी प्रयत्न केले; मात्र त्यास यश मिळाले नाही. अखेर या गाडीचे इंजिन बदलून पर्यायी इंजिन जोडण्यात आले. त्या नंतर गाडी मुंबई कडे रवाना झाली. मुंबई येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रेल्वेगाड्या विलंबाने धावत असताना त्यात अधिक भर पडली. गोदान एक्स्प्रेस फलाट क्र मांक तीनवर तब्बल एक तास उभी असल्याने मुंबईकडे जाणाºया गाड्या अन्य फलाटावरून रवाना करण्यात आल्या. तब्बल एक तास गाडीला विलंब झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
गोदान एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:06 IST
मनमाड : गोदान एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मनमाड रेल्वेस्थानकावर या गाडीचे इंजिन बदलून गाडी मुंबईकडे मार्गस्थ झाली. या तांत्रिक बिघाडमुळे गाडी तब्बल एक तास मनमाड रेल्वेस्थानकावर रखडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
गोदान एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड
ठळक मुद्देप्रवाशांना मनस्ताप : तासाभराच्या उशिराने मार्गस्थ