शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

विश्वास उटगी : पॅनकार्ड क्लब कंपनीकडून कोट्यवधींची फसवणूक पैसे परत करण्यास दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 01:26 IST

पॅनकार्ड क्लब कंपनीच्या गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी सेबीकडून दिरंगाई होत असल्याने गुंतवणूकदारांनी आपले अर्ज भरून सेबीच्या मुख्य कार्यालयावर काढण्यात येणाºया मोर्चात मोठ्या ताकदीने सहभागी व्हावे, असे आवाहन बॅँक कामगार नेते विश्वास उटगी यांनी केले.

ठळक मुद्देगुंतवणूकदारांची रक्कम परत करण्यात आली नाहीराज्यात २७ लाख गुंतवणूकदार जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची बैठक

नाशिकरोड : पॅनकार्ड क्लब कंपनीच्या गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी सेबीकडून दिरंगाई होत असल्याने गुंतवणूकदारांनी आपले अर्ज भरून सेबीच्या मुख्य कार्यालयावर काढण्यात येणाºया मोर्चात मोठ्या ताकदीने सहभागी व्हावे, असे आवाहन बॅँक कामगार नेते विश्वास उटगी यांनी केले.पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीत देशभरातून लाखो गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक केली आहे. सेबीने पॅनकार्ड क्लबला नोटीस पाठवून गुंतवणूक घेण्यास प्रतिबंध करून गुंतवणुकीची रक्कम गुंतवणूकदारांना परत करण्यास सांगितले होते; मात्र पॅनकार्ड क्लब कंपनीकडून गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्यात आली नाही. न्यायालयाने सेबीला मालमत्ता विक्री करून गुंतवणूकदारांचे पैसे अदा करण्याचे आदेश दिले आहेत; मात्र सेबीकडून मालमत्तेचा कुठलाही लिलाव करण्यात आला नसून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी दिरंगाई केली जात आहे. देशात जवळपास ५१ लाख व राज्यात २७ लाख गुंतवणूकदार आहे. यावेळी मुंबईचे सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त अशोक गोरे यांनी उपस्थितांना कायदेशीर लढ्याबाबत मार्गदर्शन केले. व्यासपीठावर ए.एस. पेडणेकर, राजू देसले, सी.ए. मोरे, व्ही.सी. बेर्डे, के.ई. अपुल, ए.जी. मेना, एस.पी. निगळ, पी.डी. अपुल, पी.एस. पेटकर आदी उपस्थित होते. पॅनकार्ड क्लबच्या गुंतवणूकदारांनी इन्व्हेस्टर अ‍ॅक्शन फोरम चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली असून, इच्छामणी लॉन्समध्ये नाशिक जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची बैठक घेण्यात आली. बैठकीत बॅँक कामगार नेते विश्वास उटगी यांनी गुंतवणूकदारांना आपले अर्ज इन्व्हेस्टर ट्रस्टकडे जमा करण्याचे आवाहन केले. डिसेंबर अखेरपर्यंत सेबीच्या मुंबई बांद्रा येथील मुख्य कार्यालयावर गुंतवणूकदारांचा मोर्चा काढण्यात येणार असून गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उटगी यांनी केले.