शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
2
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
3
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
4
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
5
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
6
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
8
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
9
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
10
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
11
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
12
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
13
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं
14
Crime : माता न तूं वैरिणी! काळ्या जादुचं भूत चढलं, तांत्रिकासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलीला विकलं 
15
पाळीव श्वानाने शेजाऱ्याला चावले, कोर्टाने मालकाची केली ४ महिने जेलमध्ये रवानगी, काय आहे प्रकरण?
16
IPL 2025 Eliminator : रोहितला मिळाला नवा ओपनिंग पार्टनर; हार्दिक पांड्यानं या दोघांवरही दाखवला भरवसा
17
भारताचा AMCA प्रोजेक्ट...अमेरिकेचा आश्चर्यकारक प्रस्ताव; रशियानेही दिली मोठी ऑफर
18
उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी
19
Video : तो फ्लॉवर समजला, पण वाघ फायर निघाला! तरुणाला वाघासोबत सेल्फी काढणं पडलं महागात, बघा नेमकं काय झालं...  
20
मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता

आयएमएच्या भिंतीवर भुजबळ विरुद्ध फडणवीस

By admin | Updated: July 14, 2014 00:32 IST

आयएमएच्या भिंतीवर भुजबळ विरुद्ध फडणवीस

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्था असो अथवा बॅँका, साखर कारखाने... या ठिकाणी प्रतिस्पर्ध्यांवर कुरघोडी करण्याचे हिडीस राजकारण नवे नाही. एकाच रस्त्याचे अथवा समाजमंदिराचे दोनदा-तीनदा भूमिपूजन-उद्घाटन करण्याचे प्रकार सातत्याने पाहायला मिळतात. परंतु धन्वंतरींच्या संस्थेमध्ये असेच राजकारण बघायला मिळाले तर त्याची चर्चा होणारच. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेने शालिमारवरील आपल्या सभागृहाचे नूतनीकरण सहा वर्षांत दोनदा करण्याचा पराक्रम करताना सभागृहाच्या बाहेर भिंतीवर नूतनीकरणाच्या पहिल्या कोनशिलेशेजारीच दुसरी कोनशिला लावत धन्वंतरींच्या संस्थेतही ‘राजकारण’ असल्याचे उघड केले आहे. विद्यमान अध्यक्षांनी दिलेला कोनशिलेचा हा बुस्टर डोस मात्र संस्थेतील अनेकांना मानवलेला नाही. इंडियन मेडिकल असोसिएनच्या नाशिक शाखेची शालिमारवर इमारत असून, त्यातील दोन सभागृहे विविध कार्यक्रमांसाठी भाड्याने दिली जातात. त्यापासून संस्थेला उत्पन्नही मिळते. या सभागृहांचा अधिकाधिक वापर व्हावा व उत्पन्न वाढावे यासाठी २००८ मध्ये शाखेचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. पंकज गुप्ता व सेक्रेटरी डॉ. सुधीर संकलेचा यांच्या टीमने सुमारे बारा लक्ष रुपये खर्चून सभागृहाचे नूतनीकरण केले. या नूतनीकरणासाठी डॉ. प्रकाश व डॉ. ललिता जोशी यांनी १० लक्ष रुपयांची देणगी दिली होती. त्यानुसार १६ फेब्रुवारी २००८ रोजी पालकमंत्री छगन भुजबळ व नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या उपस्थितीत नूतनीकृत सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले आणि सभागृहाचे डॉ. एच. एस. जोशी आॅडिटोरिअम असे नामकरणही झाले. सभागृहाच्या नूतनीकरणानंतर आयएमएच्या उत्पन्नात भर पडत गेली. सभागृह चांगल्या स्थितीत असताना अध्यक्ष डॉ. राहुल अहेर व सेक्रेटरी मंगेश थेटे यांच्या कार्यकारिणीने पुन्हा नूतनीकरणाचा घाट घातला. सभागृहाची डागडुजी करण्याऐवजी पूर्ण सिलिंग व अन्य कामे नव्याने करण्यात आली. त्यासाठी सुमारे २० लक्ष रुपये खर्ची पडल्याचे सांगितले जाते. सहा वर्षांतच दोनदा नूतनीकरण करताना त्याचा उद्घाटनाचा जंगी सोहळाही नुकताच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत घडवून आणण्यात आला. हा सारा प्रपंच करताना विद्यमान अध्यक्षांनी आपल्या नेत्यासह स्वत:च्या नावाची कोनशिला तयार करत ती नूतनीकरणाच्या पहिल्या कोनशिलेशेजारीच बसविली. त्यामुळे आयएमच्या भिंतीवर भुजबळ विरुद्ध फडणवीस असे चित्र बघायला मिळत आहे. मुळात नूतनीकरणाची काही एक गरज नव्हती. साध्या दुरुस्तीनेही सभागृहाची अवस्था सुधारता आली असती. पुन्हा नूतनीकरण तर केलेच शिवाय कोनशिला लावत आपली राजकीय महत्त्वाकांक्षाही विद्यमान अध्यक्षांनी दाखवून दिली असल्याचा सूर आता संस्थेतील सभासदांमधूनच उमटतो आहे. धन्वंतरींच्या संस्थेत राजकारणाशी निगडित व्यक्तींनी शिरकाव केला तर अशा ‘टाक्याच्या शस्त्रक्रिया’ बघायला मिळणारच, अशी समजूत आता सभासदांनी करून घेतली आहे. भविष्यात आयएमएच्या भिंती अशा कोनशिलांनी भरण्याचा उपहासात्मक भावही काहींनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)