शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

‘ग्लुटन फ्री फूड’ चे फॅड जोरात

By admin | Updated: June 6, 2014 23:53 IST

ग्लुटन नावाचं एक प्रथिन रोजच्या काही ठराविक पदार्थांत आढळतं. उदा. गहू आणि बार्ली! हे ग्लुटन असणारे पदार्थ फारच कमी आहेत; पण गव्हापासून बनवले जाणारे आणि खाल्ले जाणारे पदार्थ भरपूर आहेत.

 

नाशिक,  - आजकाल नवनवीन आजार ऐकायला मिळतात. बरेचसे आजार तर असे असतात की त्यांचे निदानच होत नाही. त्याची लक्षणं पाहून औषधोपचार केले जातात, रुग्ण बराही होतो पण आजाराचे निदान काही केल्या होत नाही. अशा परिस्थितीत किमान लक्षणं तरी तपासून पहावी असा विचार करुन एखाद्या ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी हल्ली डॉक्टर रुग्णांना एक महिना ‘ग्लुटन फ्री फुड’ खा असा सल्ला देतात. एक महिना पोळी बंद करा, अजिबात खाऊ नका, पोळीबरोबरच गव्हापासून तयार होणारे पदार्थ जसे ब्रेड, पाव आदि खाऊच नका असाही सल्ला देतात. जर या दरम्यान तुम्हाला आराम पडला, त्रास कमी झाला तर तुम्हाला ग्लुटन फुडची अ‍ॅलर्जी झालेली आहे, त्यानुसार आपण उपचार करु असे सांगितले जाते. नेहेमीच्या छोट्या दुकानांपासून ते मोठ्या मॉलपर्यंत सर्वत्र हल्ली ही ग्लुटन फ्री फ्रोडक्ट मिळू लागली आहेत. लोकांची बदलती जीवनशैली, सध्याचे आजार, वैद्यकीय जगात झालेली प्रगती, आहारशास्त्राचा झालेला विकास आणि लोकांमध्ये आलेली जागरूकता याचा आरसा म्हणजे हा ग्लुटन फ्री कपाटाचा कोपरा असे समीकरण आता बनले आहे. अशी जागरूकता किंवा अशा विविध पदार्थांची गरज, मागणी आण ित्यानुसार उपलब्धता ही इतर देशांत मोठ्या प्रमाणावर दिसते. आपल्याकडे आत्ता कुठे या सगळ्यांची सुरु वात होऊ लागली आहे; ग्लुटन फ्री आहार म्हणजे काय?ग्लुटन नावाचं एक प्रथिन रोजच्या काही ठराविक पदार्थांत आढळतं. उदा. गहू आणि बार्ली! हे ग्लुटन असणारे पदार्थ फारच कमी आहेत; पण गव्हापासून बनवले जाणारे आणि खाल्ले जाणारे पदार्थ भरपूर आहेत. उदा. मैदा, ब्रेड, शेवया, रवा, बिस्कीटं, पोळी, शंकरपाळ्या, सामोसे. इतरही कित्येक पदार्थांत गहू किंवा मैदा आणि पर्यायाने ग्लुटन असतंच. पोळी बनवण्यासाठी कणीक मळताना जी प्रक्रि या होते त्यामुळे त्यात एकप्रकारचा चिकटपणा तयार होतो. या चिकटपणामुळे आपण ती पोळी लाटू शकतो. ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा तांदळामध्ये हे ग्लुटन नसतं म्हणूनच त्यांच्या पिठाची पोळी लाटता येत नाही, तर त्याची भाकरी करावी लागते. पोळीला हा चिकटपणा त्यातील ग्लुटनमुळे येतो आणि काही जणांचं शरीर हे प्रथिन नीट पचवू शकत नाहीत. मग ते तसंच न पचलेल्या अवस्थेत लहान आतड्यात पोचतं आणि त्रासदायक ठरतं. त्या व्यक्तीला त्रास व्हायला लागतो. मग डॉक्टर हा घटक थांबवून काही होत का याची चाचपणी करायला सुरवात करतात.हा आहार कशासाठी?लहान आतड्यांचा दाह होत असलेल्या ‘सिलियेक स्प्रू’ नावाच्या आजारात ग्लुटन फ्री आहार घेतला जातो. पाश्चिमात्य देशांत या आजाराचं प्रमाण जास्त आहे. या आजारात आपल्याच पांढर्‍या पेशी आतड्यांच्या स्वस्थ पेशींना शत्रू समजून त्यांच्यावर हल्ला चढवतात. या आजाराला आधुनिक वैद्यक शास्त्रात काही उपचार नाही. मात्र, ग्लुटन फ्री आहारामुळे या आजारात आराम आणि पुढील त्रास कमी होण्यासाठी उपयोग होऊ शकतो. या लोकांना ग्लुटन फ्री आहार घेणं गरजेचं होतं; कारण तसं न केल्यास लहान आतड्यांना अजून त्रास होतो. यामुळे काही महत्त्वाची जीवनसत्वं आणि क्षार शरीरात शोषले जात नाहीत.घ्यावा की नाही?सध्या ‘ग्लुटन फ्री’ आहारावर अजून संशोधन चाललेलं असून अजून काही आजारात किंवा वेगळ्या प्रकारे त्याचा फायदा होऊ शकतो. काही जण ग्लुटन या पदार्थांना संवेदनशील असू शकतात. गव्हाचे पदार्थ खाल्ल्यानं पोट बिघडणं, अंगावर पुरळ उठणं, डोकं दुखणं, पोट दुखणं अशी लक्षणं दिसतात आणि गहू व त्यापासून बनलेले पदार्थ न खाल्ल्यास ती कमी होतात. ‘इरिटेबल बावल सिंड्रोम’ या अतिशय सामान्यपणे आढळणार्‍या विकारातही गहू बंद केल्याचा उपयोग झालेला दिसून आलेलं आहे. ‘ग्लुटन फ्री’आहार हा आॅटिझमच्या मुलांनाही दिला जातो. तसंच वजन कमी करण्यासाठीही याचा विचार केला गेलेला आहे. तरीही यावर अजून जास्त संशोधन होणं गरजेचं आहे. ‘ग्लुटन फ्री’ आहार घेतल्यानं गहू आणि त्यापासून बनवलेले अनेक पदार्थ आपोआपच खाल्ले जाणार नाहीत आणि त्यामुळे एकूण कॅलरीज कमी होत असाव्यात. म्हणून वजन कमी करण्यासाठी त्याचा विचार केला जात आहे.काय काळजी घ्याल?‘ग्लुटन फ्री’ आहार घेताना सुरु वातीला थोडा त्रास होऊ शकतो; पण हळूहळू आहारात थोडीशी कल्पकता दाखवली, तर तो सोपा वाटू शकतो. या आहाराची संकल्पना आपल्याकडे तशी नवी आहे. त्यामुळे बाजारात गेलो आणि ‘ग्लुटन फ्री’ पदार्थ मागितले, तर ते पटकन मिळतीलच असं नाही. खरंतर तांदूळ आणि इतर अनेक पदार्थ ‘ग्लुटन फ्री’ च असतात; पण ‘ग्लुटन फ्री’ असं लेबल लावून ते जास्त किमतीला विकले जातात. सॉस किंवा कृत्रिम स्वादातही खूपदा ग्लुटन वापरलेलं असतं. त्यामुळे ते नकळत आपल्या पोटात जाऊ शकतं आणि त्याचा त्रास होऊ शकतो. प्रवासात, बाहेर हॉटेलात किंवा पार्टीला गेल्यावर विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. ग्लुटन फ्री आहार करताना बहुतेक पदार्थ टाळले जात असल्यानं आहारातील विविधता कमी होऊन एकंदर पोषण कमी होतं. यामुळे शरीराला विविध पोषक तत्त्वांची कमतरता जाणवू शकते. यासाठीच अशा विशेष आहाराची बांधणी करताना तज्ज्ञांची मदत घेणं आवश्यक असतं.ग्लुटनची तपासणीशरिरातील ग्लुटनची पातळी किती आहे हे पहाण्यासाठी तीन चार तपासण्या केल्या जातात. मात्र या तपासण्या पाश्चिमात्य देशांमध्ये होतात. आपल्याकडे त्या फारशा होत नाही. छोटया खेड्यांमध्ये तर नाहीच पण हातावर मोजण्याइतक्या मोठ्या शहरांमध्ये होतात. त्याबद्दल फार कमी डॉक्टरांना माहिती आहे. या तपासण्या आपल्याकडे सहजतेने उपलब्ध झाल्यात तर आजाराचे निदान लवकर होईल.