देवळाली कॅम्प : चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेला नाशिक सहकारी साखर कारखान्यावर शासनाने प्राधिकृत मंडळाची नियुक्ती केल्याने कुठल्याही परिस्थितीत पुढील गळीत हंगाम सुरू होईलच, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब सानप यांनी केले. नाशिक सहकारी साखर कारखान्यावर शासनाने तानाजी गायधनी यांच्या अध्यक्षतेखाली १२ सदस्यांचे अशासकीय प्राधिकृत सदस्यांची निवड केल्यानंतर कार्यस्थळावर सोमवारी दुपारी ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना ते म्हणाले की, कारखाना सुरू होण्याऐवजी त्याची विक्री कसा होईल यासाठीच अनेकांनी आपले राजकीय बळ वापरले. मात्र, आता हा कारखाना सुरू होणार आहे, असे ते म्हणाले. यावेळी आमदार योगेश घोलप यांनी कारखाना सुरू होत असताना राजकारणाचे जोडे सर्वांनी बाहेर ठेवावे, असे आवाहन घोलप यांनी केले. व्यासपीठावर नासाकाचे अशासकीय सदस्य कैलास टिळे, प्रकाश घुगे, श्रीकृष्ण जानमाळी, हेमंत गायकवाड, नंदू हांडे, प्रल्हाद काकड, सुदाम भोर, मोहन डावरे, अरुण जेजूरकर, रामचंद्र खोब्रागडे, अनिता सहाणे, कमळाबाई थेटे यांच्यासह दिनकर म्हस्के, लीलाबाई गायधनी, बाजीराव भागवत, नवनाथ गायधनी, पी. बी. गायधनी, दामोदर मानकर आदि मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकामध्ये कारखाना अशासकीय प्राधिकृत मंडळाचे अध्यक्ष तानाजीराव गायधनी यांनी कारखान्याची सद्यस्थिती विषद करून कारखाना पुन्हा सुरू करण्याचा नवीन इतिहास घडवायचा आहे. सभासद, कामगार यांनी हातात हात घालून स्वच्छ कारभार करीत कारखाना उर्जितावस्थेत आणून शासनाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवायचा आहे, असे गायधनी यांनी सांगितले. यावेळी अॅड. सुभाष हारक, अॅड. बाळासाहेब आडके, मधुकर जेजूरकर, श्रीकांत गायधनी, प्रकाश घुगे, अशोक साळवे, श्रीपत टिळे, बबनराव कांगणे, जयंत गायधनी, अशोक खालकर, बाळासाहेब म्हस्के, विष्णुपंत गायखे, सुदाम भोर, रामचंद्र काकड आदिंनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्याचे सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर व आभार सुरेश सानप यांनी मानले. (वार्ताहर)
पुढील गळीत हंगामात कारखाना सुरु होईलच
By admin | Updated: January 17, 2017 01:11 IST