शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
3
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
4
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
5
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
6
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
7
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'
8
शेअर असावा तर असा...! ₹15 वरून ₹455 वर पोहोचला शेअर, आता मोठा व्हिस्की ब्रँड खरेदी करणार कंपनी!
9
Ajit Pawar Birthday: अजित पवारांचा असाही एक कार्यकर्ता, ११ एकर शेतजमिनीवर दादांचे चित्र रेखाटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
10
२ मिनिटांत ₹१००० कोटींचा नफा; 'या' कंपनीच्या शेअरनं केली कमाल, मालकासह गुंतवणूकदारही मालमाल
11
सावधान...! १७ रुपयांपर्यंत घसरू शकतो या बँकेचा शेअर, २-२ तज्ज्ञांनी दिलाय विक्रीचा सल्ला; जाणून घ्या
12
मस्करीची कुस्करी! मी पडले तर तू मला वाचवशील? नवऱ्याला प्रश्न विचारला, कठड्यावरुन पाय घसरला
13
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
15
वालाचं बिरडं आणि डाळिंब्यांची उसळ यात आहे छोटासा फरक; श्रावण विशेष पारंपरिक रेसेपी 
16
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
17
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
18
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
19
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
20
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!

नागरी सेवा केंद्रावर ‘आधार’ची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:21 IST

सर्वाेच्च न्यायालयाने आधार कार्ड व त्या संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार यापुढे शासकीय देखरेखीखाली आधार केंद्र चालविले जाणार असून, त्यासाठी नाशिक शहरात महापालिकेच्या १६ नागरी सुविधा केंद्रांवर येत्या दोन दिवसांपासून आधार केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात मंडळ अधिकाºयांच्या कार्यालयात या केंद्रांचे कामकाज चालणार आहे.

नाशिक : सर्वाेच्च न्यायालयाने आधार कार्ड व त्या संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार यापुढे शासकीय देखरेखीखाली आधार केंद्र चालविले जाणार असून, त्यासाठी नाशिक शहरात महापालिकेच्या १६ नागरी सुविधा केंद्रांवर येत्या दोन दिवसांपासून आधार केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात मंडळ अधिकाºयांच्या कार्यालयात या केंद्रांचे कामकाज चालणार आहे. शासनाने आधार केंद्रे चालविण्याचे काम काही शासकीय यंत्रणेबरोबरच खासगी कंपन्यांनाही दिले होते. त्यासाठी बेसिक या कंपनीच्या माध्यमातून आधार कार्ड काढून देण्याचा करार शासनाने केला होता. डिसेंबर महिन्यात शासनाचा व कंपनीचा करार संपुष्टात आल्यानंतर शासकीय आधार केंद्रे बंद पडली होती. शासनाने महा आॅनलाइनच्या माध्यमातून बंद पडलेल्या आधार यंत्राचे अद्यावतीकरण करण्यास सुरुवात केली. परंत ही प्रक्रिया अतिशय संथ असल्याने व त्यातच शासनाने सर्वच शासकीय योजना व सोयी, सवलतींसाठी आधार अनिवार्य केल्याने नागरिकांची आधार कार्ड काढण्यासाठी हेळसांड होऊ लागली होती. नाशिक महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रांमध्ये सोळा ठिकाणी येत्या दोन दिवसांत ही केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (प्रशासन) डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी दिली. या आधार केंद्रांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्या त्या विभागीय अधिकाºयांवर निश्चित करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातही आधारची सुविधा नसल्याची बाब लक्षात घेऊन मंडळ अधिकाºयांच्या कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जी यंत्रे सध्या अस्तित्वात आहे त्यांचे वाटप करण्यात येईल. मंडळ अधिकाºयांनी आधार केंद्रावर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या बंद असलेली यंत्रे शासनाकडून ज्या प्रमाणात अद्ययावत करण्यात येतील त्या प्रमाणात आधार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.७० आधार केंद्रे तत्काळ कार्यान्वितनाशिक जिल्ह्यात शासकीय १४० आधार यंत्रे असल्याने यातील निम्म्याच यंत्रांचे अद्ययावतीकरण आजपावेतो झाले आहे. नागरिकांची गरज ओळखून ७० केंद्रे तत्काळ कार्यान्वित करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासाने घेतला आहे. तत्पूर्वी शासनाने आधार केंद्रे शासकीय कार्यालयात बसविण्याचे निर्देश यंत्रणेला दिल्यामुळे आता शाळा, समाजमंदिरांमध्ये सुरू असलेली आधार केंद्रे शासकीय कार्यालयांमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहेत.सोळा ठिकाणी व्यवस्थानाशिक महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रांमध्ये सोळा ठिकाणी येत्या दोन दिवसांत ही केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (प्रशासन) डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी दिली. या आधार केंद्रांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्या त्या विभागीय अधिकाºयांवर निश्चित करण्यात येणार आहे.