शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोड रेल्वेस्थानकावर प्रवाशांना सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 00:44 IST

रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने विविध सोयीसुविधा पुरविण्यात येत आहेत.

नाशिकरोड : रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने विविध सोयीसुविधा पुरविण्यात येत आहेत.  मोबाइलचा वाढता वापर व गरज लक्षात घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील सर्व प्रतीक्षागृहात व प्लॅटफॉर्म एकवर आरक्षण सूची फलकाजवळ असे एकूण सहा यूएसबी मोबाइल चार्जिंग पॉइंट लावण्यात आले आहे. एका यूएसबी मोबाइल चार्जिंग पॉइंटवर एकावेळी दहा मोबाइल चार्जिंग होण्याची व्यवस्था आहे.प्रवासादरम्यान मोबाइल चार्जिंग करण्याची मोठी गरज होते. नाशिकरोड रेल्वेस्थानकांवरील सर्व प्रवासी प्रतीक्षागृह व प्लॅटफॉर्मवर प्लगपीन सॉकेट उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी एकच चार्जर लागत असल्याने संबंधितांचाच मोबाइल चार्ज होऊ शकत होता. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.रेल्वेस्थानकावरील पुरुष-स्त्री प्रवासी स्वतंत्र वातानुकूलित प्रतीक्षालय, सर्वसाधारण व स्लिपर कोचचे प्रतीक्षालय तसेच प्लॅटफॉर्म एकवर आरक्षण सूची फलकाजवळ रेल्वे प्रशासनाकडून एकूण सहा यूएसबी मोबाइल चार्जिंग पॉइंट बसविण्यात आले आहे. एका यूएसबी मोबाइल चार्जिंग पॉइंटवर एकावेळी १० मोबाइल चार्जिंग होण्याची व्यवस्था असून तेथे मोबाइल ठेवण्याचीदेखील व्यवस्था आहे. यामुळे प्रवाशांना मोबाइल चार्जिंग करण्यासाठी लावला असताना मोबाइल पकडून उभे राहण्याची गरज नाही. यूएसबी चार्जिंग पॉइंट लावून दिल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास मदत झाली आहे.जास्त पॉइंट लावण्याची गरजनाशिकरोड रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची वर्दळ लक्षात घेऊन एक-दोन व तीन क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर, रेल्वे पोलीस ठाणे, आरक्षण- तिकीट घर, पार्सल आदी गर्दीच्या ठिकाणी जास्त यूएसबी मोबाइल चार्जिंग पॉइंट लावण्याची गरज आहे.

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी