शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षा अभ्यासाकरिता मोफत अभ्यासिके ची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 00:47 IST

स्पर्धा परीक्षेच्या तयारीकरिता आवश्यक पुस्तके व साहित्य सहज उपलब्ध व्हावे यासाठी सीबीएसजवळील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात करिअर ग्रंथालय व अभ्यासिका सुरुवात उपलब्ध करून देण्यात आली आहे

नाशिक : स्पर्धा परीक्षेच्या तयारीकरिता आवश्यक पुस्तके व साहित्य सहज उपलब्ध व्हावे यासाठी सीबीएसजवळील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात करिअर ग्रंथालय व अभ्यासिका सुरुवात उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत या अभ्यासिका व ग्रंथालयाचा फायदा घेता येणार आहे.  विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीकरिता एक हजार पुस्तकांसह अन्य साहित्य या अभ्यासिकेत विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले असून, यात केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक पात्रता परीक्षा, स्टाफ सिलेक्शन कमिशन, लिपिक, टंकलेखक, आयबीपीएस, एसबीआय बँक भरती, आरोग्य सेवक भरती आदी विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीकरिता आवश्यक पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्वत:चा उद्योग व्यवसाय करू इच्छिणाºयांसाठी याबाबतची सखोल व शास्त्रीय ज्ञान व माहिती उपलब्ध व्हावी यासाठी विविध मार्गदर्शनपर पुस्तकेही या ग्रंथालयात समाविष्ट असल्याची माहिती केंद्राचे सहायक संचालक संपत चाटे यांनी दिली आहे.अभ्यासिकेत सकाळी १० ते दुपारी २ आणि दुपारी २ ते सांयकाळी ६ वाजेपर्यंत अशा प्रत्येकी चार तासांच्या दोन सत्रांमध्ये प्रवेशासाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. जागा उपलब्ध असेपर्यंत प्रथम येणारास प्रथम प्राधान्य पद्धतीने प्रवेश देण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांनी आधारकार्ड व इतर ओळखपत्रासह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात संपर्क साधावा- संपत चाटे, सहायक संचालक,  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा