शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

विधान परिषदेवर डोळा : संकटात भर पडल्याने नैराश्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:30 IST

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्वच संचालकांवर सहकार खात्याने साडेआठ कोटी रुपयांच्या वसुलीचे दोषारोपपत्र दाखल करून आरोपीच्या पिंजºयात उभे केल्याने गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर डोळा ठेवून तयारी करणाºया इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले असून, एकीकडे सहकार खात्याच्या वसुलीचा तगादा, तर दुसरीकडे चौकशीत बेकायदेशीर ठरविलेल्या नोकरभरतीत घेतलेले पैसे परत करण्याची आलेली वेळ पाहता, इच्छुकांवर दुहेरी संकट कोसळले आहे.

ठळक मुद्देजिल्हा बॅँकेवरील कारवाईने इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी ! संचालकांवर सहकार खात्याने साडेआठ कोटी रुपयांच्या वसुलीचे दोषारोपपत्र दाखल

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्वच संचालकांवर सहकार खात्याने साडेआठ कोटी रुपयांच्या वसुलीचे दोषारोपपत्र दाखल करून आरोपीच्या पिंजºयात उभे केल्याने गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर डोळा ठेवून तयारी करणाºया इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले असून, एकीकडे सहकार खात्याच्या वसुलीचा तगादा, तर दुसरीकडे चौकशीत बेकायदेशीर ठरविलेल्या नोकरभरतीत घेतलेले पैसे परत करण्याची आलेली वेळ पाहता, इच्छुकांवर दुहेरी संकट कोसळले आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळात एक खासदार, चार विद्यमान व चार माजी आमदारांचा समावेश असून, काहींनी यापूर्वी विधान सभेची निवडणूक लढवून आपले राजकीय भवितव्यही अजमाविले आहे. त्यामुळे जिल्हा बॅँक म्हणजे राजकारणाचा अड्डा मानला जात असल्याने याठिकाणी निवडून येणाºयांचे राजकीय मनुसुबे लपून राहिलेले नाहीत. जिल्हा बॅँकेची आर्थिक उलाढाल व चौकशीत उघड झालेल्या गैरव्यवहाराचा आकडा पाहता, जिल्हा बॅँकेत निवडून आल्यानंतर शेतकरी हिताचे काम करण्याऐवजी पैसे कमविण्याचाच मार्ग झाल्याची संशय घेण्याजोगी परिस्थिती आहे.याच पैशातून अनेकांना आमदारकीची स्वप्नेही गेल्या काही दिवसांपासून पडत असताना त्यात नेमके सहकार खात्याच्या कारवाईने विघ्न कोसळले आहे. चालू वर्षी विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक होणार असून, मोजकेच मतदार सदस्य असलेल्या या मतदारसंघात एकेक मत ‘लाख मोलाचे’ असल्याने त्यासाठी द्रव्य सांडण्याची तयारी ठेवणाºयांनाच लढण्यासाठी रिंगण मोकळे असल्याचे मानले जाते. नेमके तेच हेरून माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे, विद्यमान अध्यक्ष केदा अहेर, परवेज कोकणी, माणिकराव कोकाटे या संचालकांकडून विधान परिषद निवडणुकीची तयारी केली जात होती. दराडे यांनी तर उमेदवारीसाठी ‘मातोश्री’च्या अनेकवार पायधूळ झाडल्या असून, भाजपाच्या वळचणीला लागलेले परवेज कोकणी यांना दिवसाही आपल्यालाच उमेदवारी मिळण्याचे स्वप्न पडू लागले आहेत. अध्यक्ष झाल्यामुळे केदा अहेर यांना उमेदवारी मिळण्याची पुरेपूर खात्री असल्याने की काय त्यांनी राष्टÑवादीशी जवळिकता साधण्याचा प्रयत्न चालविला होता. परंतु आता मात्र या साºया तयारीवर पाणी फेरण्याची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा बॅँकेवर दुहेरी कारवाई झाल्याने या संचालकांच्या नितीधैर्यावरही परिणाम झाला असून, निवडणुकीला सामोरे जाताना बॅँकेची वसुली, कोर्टकज्जा यासाºया बाबींचा विचार करता प्रत्यक्षात स्वप्न अवतरणे कठीण मानले जात आहे.