शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

नेत्रदान चळवळ अधिक गतिमान व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:09 IST

नाशिक : मानवी जीवनात प्रत्येक अवयवाला महत्त्व असून, त्यात डोळा हा अवयव अधिक महत्त्वाचा समजला जातो, कारण त्यामुळेच आपण हे सर्व जग पाहू शकतो. परंतु ज्यांना जन्मत:च डोळे नाहीत किंवा अपघातामुळे डोळे गेले आहेत, अशा व्यक्तींसाठी हे जग कसे असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. परंतु मरणोत्तर नेत्रदानातून आपण त्या लोकांना हे सुंदर जग पाहण्याची दृष्टी प्रदान करू शकतो, त्यासाठी कोणताही विशेष संकल्प करण्याची गरज नाही.

नाशिक : (मुकुंद बाविस्कर) मानवी जीवनात प्रत्येक अवयवाला महत्त्व असून, त्यात डोळा हा अवयव अधिक महत्त्वाचा समजला जातो, कारण त्यामुळेच आपण हे सर्व जग पाहू शकतो. परंतु ज्यांना जन्मत:च डोळे नाहीत किंवा अपघातामुळे डोळे गेले आहेत, अशा व्यक्तींसाठी हे जग कसे असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. परंतु मरणोत्तर नेत्रदानातून आपण त्या लोकांना हे सुंदर जग पाहण्याची दृष्टी प्रदान करू शकतो, त्यासाठी कोणताही विशेष संकल्प करण्याची गरज नाही. केवळ एक अर्ज भरून दिल्यानंतर कुणालाही मृत्युपश्चात नेत्रदान करण्यात करता येणे शक्य आहे. सध्याच्या काळात अंधत्वाच्या तक्रारीत वाढ होत असून, नेत्रदान चळवळ अधिक गतिमान व्हावी, याकरिता नेत्रतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्यांकडून जनजागृती करण्यात येत आहे.नेत्रदानाचे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी दि.१० जून हा दिवस जागतिक दृष्टिदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी लोकांमध्ये नेत्रदानाविषयी जनजागृती करण्यात येते. आपण घेतलेल्या एका निर्णयामुळे एखाद्याचे आयुष्य सुंदर आणि सुखकर होऊ शकते. दृष्टी नसेल तर निसर्गाने निर्माण केलेले हे सुंदर जग पाहता येत नाही. परंतु, या अतिशय महत्त्वाच्या अवयवाची आपण काळजी घेत नाही. सध्या मोबाइल, इंटरनेट यामुळे अंधत्व येण्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. साधारणत: एक वर्ष वयापासून ते चांगली दृष्टी असल्यास ५० वय पूर्ण केलेली कोणतीही व्यक्ती नेत्रदान करू शकते.नेत्रदान हे मोतिबिंदू शस्त्रक्रिया, मधुमेह आणि चष्मा वापरणारी व्यक्तीही करू शकते. आपल्या मृत्यू पत्रात नेत्रदानाची इच्छा व्यक्त करून आणि त्याविषयी जवळच्या नातेवाइकांना कल्पना देऊन मृत व्यक्तीचे डोळे पुढे कोणाच्यातरी उपयोगी पडू शकतात. त्यामुळे याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. कोणतीही व्यक्ती नेत्रदान करू शकते, त्यामुळे प्रत्येकाने नेत्रदानाचा अर्ज भरून देणे ही काळाची गरज ठरली आहे.---------------------संपूर्ण जगात ४५ दशलक्ष दृष्टिहीन लोक आहेत. त्यापैकी एक तृतीयांश म्हणजेच १५ दशलक्ष दृष्टिहीन लोक हे भारतात आहेत. अनेक देशांमध्ये गरिबीमुळे पोषण आहार न मिळाल्याने, अपघात, विविध आजार अशा विविध कारणांमुळे अनेकांना अंधत्व येते. अकाली अंधत्व आलेल्या लोकांवर शस्त्रक्रिया करून नवीन दृष्टीपटल बसवून दृष्टी परत दिल्या जाऊ शकते.- डॉ. अमित धांडे, नेत्ररोगतज्ज्ञ

टॅग्स :Nashikनाशिक