प. सा. नाट्यगृहात ‘सुंदर ते रुप’ कार्यक्रमात भक्तिगीत गाताना श्रीकृष्ण चंद्रात्रे व सोनाली चंद्रात्रे-पटेल. समवेत साथसंगत करताना ज्ञानेश्वर कासार, राजन अग्रवाल, आदित्य कुलकर्णी, जितेंद्र सोनवणे, आनंद शहाणे आदी.नावीन्यपूर्ण भक्तिगीतांचीनाशिक : ‘सुंदर ते रूप’ हा अभंग, ‘श्री हरी भजसी मीरा’ हे भक्तिगीत तर ‘झिम्माड पावसात’ या भक्तिगीतासह विविध गीतांचे सादरीकरण रविवारी (दि. १०) ‘सुंदर ते रूप’ या कार्यक्रमात सादर करण्यात आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास रसिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्ण चंद्रात्रे यांनी गायलेल्या गणेश वंदनेने झाली . ‘सुंदर ते रूप’ या कविता संग्रहातील निवडक भावगीते, भक्तिगीते, अभंग, भैरवी, लावणी तसेच कव्वाली आदींना तालासुरात नावीन्यपूर्ण संगीताने संगीतबद्ध करून एकापेक्षा एक सरस गीतांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. यावेळी विविध गीतांच्या सादरीकरणासह राधेची गवळण, ‘जवानीच फुलपाखरू’, ‘लावण्याची लावण्यवती’ या लावण्या, तर ‘चरण तुझे वंदितो’, ‘भक्त पुंडलिकाचा हरी’ हे अभंग सादर करण्यात आले. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत असताना श्रीकृष्ण चंद्रात्रे यांनी गायलेल्या देवीच्या गोंधळाने कार्यक्रमात विशेष रंगत आणली.यावेळी मनोगत व्यक्त करताना भानसी यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या, तर आमदार सीमा हिरे यांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षक कधीच निवृत्त होत नसल्याचे श्रीकृष्ण चंद्रात्रे आणि विजय थोरात यांच्या कार्यावरून दिसून येत असल्याचे सांगितले. यावेळी नानासाहेब बोरस्ते, नगरसेवक गुरुमित बग्गा, शालिनी पवार, अरुण पवार, प्रा. यशवंत पाटील आदींसह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘सुंदर ते रूप’ कार्यक्रमात उधळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:08 IST