शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव प्रवास भाड्यापेक्षा जादा आकारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:50 IST

एसटी महामंडळाने चार दिवसांपूर्वी एसटी बसच्या प्रवासात १८ टक्के भाडेवाढ केली. मात्र महामंडळाच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयाकडून आॅनलाइन पद्धतीने बस वाहकाजवळ असलेल्या ‘ईटीआयएम मशीन’मध्ये वाढीव दराची चुकीच्या पद्धतीने नोंद झाल्याने प्रवासी व पासधारकांना त्यामुळे मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

नाशिकरोड : एसटी महामंडळाने चार दिवसांपूर्वी एसटी बसच्या प्रवासात १८ टक्के भाडेवाढ केली. मात्र महामंडळाच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयाकडून आॅनलाइन पद्धतीने बस वाहकाजवळ असलेल्या ‘ईटीआयएम मशीन’मध्ये वाढीव दराची चुकीच्या पद्धतीने नोंद झाल्याने प्रवासी व पासधारकांना त्यामुळे मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे. महामंडळाचे अधिकारी व कर्मचारीदेखील यामुळे गोंधळून गेले असून, बस वाहकाच्या ईटीआयएम मशीनमध्ये दरवाढीची योग्य नोंद करणे गरजेचे झाले आहे.  एसटी महामंडळाकडून बस प्रवासामध्ये १८ टक्के दरवाढीची घोषणा करून १६ जूनपासून भाडेवाढ लागू करण्यात आली. त्यानुसार महामंडळाकडून दरवाढ झालेला सुधारित भाडे तक्ता सर्व अधिकारी, बसडेपो यांना पाठविण्यात आला. मात्र बस वाहकाकडे असणाऱ्या ‘ईटीआयएम मशीन’मध्ये महामंडळाच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयाकडून आॅनलाइन झालेल्या दरवाढीच्या आकड्याची नोंद करताना चूक झाल्याने काही किलोमीटरच्या तिकिटाच्या दरात ४० ते ५० टक्के भाडेवाढ झाली आहे. बस स्थानकांतील पास वितरित करणारे अधिकारी, कर्मचारी, बसवाहक प्रत्येकी दोन किलोमीटरच्या स्लॅबला काय तिकीट दर आकारतो त्याप्रमाणेच मासिक पासला रकमेची आकारणी करू लागल्याने अव्वाच्या-सव्वा आकारणी केली जात आहे.तीन दिवसांपूर्वीच विद्यार्थ्यांना, कामगारांना मासिक पासचे अर्ज वितरित करण्यात आले होते. मंगळवारपासून विद्यार्थ्यांना पास वितरित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र बस वाहकाजवळील ईटीआयएम मशिनमध्येच चुकीच्या दरवाढीची नोंद झाल्याने व त्यानुसार मासिक पास दर आकारणी होत असल्याने विद्यार्थी व पालकांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे.  महामंडळाच्या पास वितरित कर्मचा-याच्या सांगण्यानुसार जास्तीत जास्त २२ किलोमीटर अंतरापर्यंतचे विद्यार्थी मासिक पास काढतात. १६ जूनला महामंडळाने पाठविलेला सुधारित भाडे तक्ता व बस वाहकाच्या ईटीआयएम मशीनमध्ये दरवाढ आकड्याची नोंद करताना चूक झाल्याने गोंधळ निर्माण झाला आहे शेजारील चौकटीत ‘स्टार’ केलेली आकड्यांची चुकीची नोंद ईटीआयएम मशीनमध्ये झाल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ