शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीच्या कामास आयोगाची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 13:39 IST

केंद्रीय निवडणूक आयोगाने देशपातळीवर प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय मतदार याद्यांचे अद्यावतीकरण करण्यासाठी मतदार पुर्नरिक्षण मोहिम १ नोव्हेंबरपासून सुरू केली आहे.

ठळक मुद्देपंधरा दिवस वाढवले : बीएलओेंची होणार धावपळगेल्या महिनाभरात फक्त ९२०० कुटुंबांच्या घरोघरी जावून बीएलओंनी पुर्नरिक्षण केले

नाशिक : देशपातळीवर सुरू असलेल्या मतदार याद्या अद्यावतीकरण कार्यक्रमांतर्गंत मतदारांच्या घरोघरी जावून नोंदणी करण्याच्या कामास होत असलेला विलंब पाहता, केंद्रीय निवडणूक आयोगाने या कामास आणखी पंधरा दिवस मुदतवाढ देण्याबरोबरच त्यामुळे या कामास गती द्यावी असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. आयोगाच्या या निर्णयामुळे बीएलओंना काहीसा दिलासा मिळण्यास मदत झाली आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने देशपातळीवर प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय मतदार याद्यांचे अद्यावतीकरण करण्यासाठी मतदार पुर्नरिक्षण मोहिम १ नोव्हेंबरपासून सुरू केली आहे. यात प्रत्येक मतदान केंद्र निहाय केंद्रस्तरीय अधिका-यांची (बीएलओ) नेमणूक करून मतदारांच्या घरोघरी जावूून सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. त्यात प्रामुख्याने नवीन मतदाराची नोंदणी, दुबार व मयत मतदारांच्या नावात कपात, मतदान केंद्रातील बदल, मतदारांचे छायाचित्रे गोळा करणे अशी कामे प्रत्येक घरोघरी जाऊन करणे अपेक्षित धरले आहे. शिवाय मतदारांची संपुणर्ल माहिती आॅनलाईन भरून, त्याच्या निवासाचे अक्षांश-रेखांश देखील नमूद करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. या कामासाठी सर्वच शासकीय कर्मचा-यांची नेमणूक करण्याचे शासनाचे आदेश असले तरी, जिल्हाधिका-यांनी शिक्षकांवरच ही कामे सोपविली आहेत. मुळात नोव्हेंबर महिन्यात शालेय विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू असताना त्यात शाळेचे कामकाज सांभाळून मतदार याद्यांचे काम करण्यास शिक्षकांनी विरोध दर्शविला होता, त्यातच काही शाळेच्या सर्वच्या सर्व शिक्षकांना मतदार नोंदणीच्या कामात जुंपल्यामुळे शाळा ओस पडण्याच्या भितीपोटी संस्थाचालकांनीच शिक्षकांना मतदार यादीच्या कामापासून दूर ठेवले. परिणामी देशपातळीवरच मतदार याद्यांचे पुर्नरिक्षण धिम्या गतीने होत असल्याची बाब केंद्रीय निवडणूक आयोगाने अलिकडेच घेतलेल्या राज्यांच्या आढाव्यावरून स्पष्ट झाली. सर्वच ठिकाणी बीएलओंकडून कामे होत नसल्याचे सांगण्यात आल्याने आयोगाने आता ३० नोव्हेंबर ऐवजी १५ डिसेंबरपर्यंत मतदार याद्यांचे काम पुर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.नाशिक जिल्ह्यात गेल्या महिनाभरात फक्त ९२०० कुटुंबांच्या घरोघरी जावून बीएलओंनी पुर्नरिक्षण केले असून, साडेसात लाख कुटुंबाच्या मानाने केले गेलेले सर्व्हेक्षण अगदीच अल्प असल्याने जिल्ह्यातील दहा तहसिलदारांना निवडणूक शाखेने नोटीस पाठवून जाब विचारण्याची तयारी केली आहे. परंतु आता आयोगाने याकामास मुदतवाढ दिल्यामुळे येत्या पंधरा दिवसात सदरचे काम पुर्ण करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय