शहरं
Join us  
Trending Stories
1
Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
2
Ratnagiri Crime: 'मैत्रिणीकडे चाललेय'; रत्नागिरीच्या भक्तीला प्रियकरानेच संपवलं, दुर्वास पाटील कसा अडकला?
3
एअर इंडियाच्या विमानाचे आपात्कालीन 'लँडिंग'; हवेत असतानाच इंजिनला लागली आग, प्रवासी सुखरूप
4
टॅरिफ वॉरदरम्यान PM मोदी आणि जिनपिंग यांची भेट; चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले,'एकत्र येणे महत्त्वाचे'
5
फक्त १ लाख रुपये जमा करून मिळवा १४,३२५ रुपये निश्चित व्याज! कॅनरा बँकेने आणखी खास FD योजना
6
'त्या' महिला पोलीस निरीक्षकाची बदली मॅटकडून रद्द
7
"आमच्या मालिकेवेळी तिला पुन्हा कॅन्सर...", प्रिया मराठेच्या निधनानंतर सुबोध भावेची भावुक पोस्ट
8
Amit Shah: मुंबईकरांना बदल हवा, कामाला लागा; अमित शाहांचा भाजप नेत्यांना कानमंत्र!
9
LPG, ITR ते क्रेडिट कार्ड... १ सप्टेंबरपासून ‘या’ ७ गोष्टींचा तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
10
"माझा प्रॉब्लेम आहे, मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही"; जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं
11
Maharashtra Rains: महाराष्ट्रात पावसाचा कहर, तुमच्या जिल्ह्यात किती टक्के बरसला? जाणून घ्या आकडा
12
रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत खेळणार की नाही? जाणून घ्या
13
"१० वर्षे सत्तेत होता, खोलात जायला लावू नका"; आरक्षणावरुन शरद पवारांच्या सल्ल्यावर अजितदादांचे प्रत्युत्तर
14
नंदुरबारमध्ये शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास
15
कहानी में ट्विस्ट! शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी मेलानिया ट्रम्प यांच्या नावाचे नामांकन?
16
आजचे राशीभविष्य, ३१ ऑगस्ट २०२५ : आजचा दिवस शुभ फलदायी, धन लाभ होईल, मानसिक शांतता लाभेल !
17
Mumbai Police: मुंबई पोलीस, गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या रद्द!
18
शेकडो टॉयलेट, ११ टँकर, ४५० कर्मचारी; आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना
19
हलगीचा ताल, झांजेच्या झंकाराने निनादले रस, आंदोलकांचा नाचत जल्लोष 
20
maratha andolan: आझाद मैदानात चिखलात बसून आंदोलन

कांद्यावरील निर्यातबंदी उठविणार - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 01:00 IST

सटाणा : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी निवडणूक झाल्याच्या दुसºयाच दिवशी आपण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालून कांद्यावरील निर्यातबंदी उठवू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील सभेत बोलताना दिली. याचवेळी विरोधकांवर टीका करताना त्यांनी आघाडीचा जाहीरनामा म्हणजे लबाडाघरचं आवतन असल्याचीही टीका केली.

ठळक मुद्देसटाणा येथे सभा : आघाडीचा जाहीरनामा म्हणजे लबाडाघरचं आवतन असल्याची टीका

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी निवडणूक झाल्याच्या दुसºयाच दिवशी आपण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालून कांद्यावरील निर्यातबंदी उठवू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील सभेत बोलताना दिली. याचवेळी विरोधकांवर टीका करताना त्यांनी आघाडीचा जाहीरनामा म्हणजे लबाडाघरचं आवतन असल्याचीही टीका केली.येथील पाठक मैदानावर बुधवारी (दि.९) सायंकाळी बागलाण विधानसभा मतदारसंघातील भाजप-सेना महायुतीचे उमेदवार दिलीप मंगळू बोरसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, उमेदवार व माजी आमदार दिलीप बोरसे, माजी आमदार उमाजी बोरसे, नगराध्यक्ष सुनील मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या २३ मिनिटांच्या भाषणात गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचा आलेख वाचून दाखवण्याबरोबरच कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचा त्यांनी समाचार घेतला. फडणवीस यांनी सांगितले, आघाडीच्या जाहीरनाम्यात फक्त एकच गोष्ट राहून गेली ती म्हणजे प्रत्येक नागरिकाला एक ताजमहाल बांधून देऊ. पंधरा वर्षे खोटीआश्वासने देऊन निवडणुका जिंकल्या, मात्र एकही आश्वासन पूर्ण केले नाही. उत्तर महाराष्ट्राला वरदान ठरणारानार-पार प्रकल्प आगामी काळात भाजपला साथ दिल्यास येत्या पाच वर्षांत तोदेखील पूर्णत्वास नेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.दरम्यान, बागलाणमधील सिंचनाचे प्रश्न, प्रत्येक नदीवर केटीवेअर बंधारे, प्रत्येक घराला नळाचे पाणी, प्रत्येक शेतशिवारात पाणी, वीज, आरोग्य, रस्ते आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून तालुका सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी दिलीप बोरसे यांच्या सारख्या हाडाच्या शेतकºयाला विधानसभेत पाठविण्याचे आवाहनही शेवटी त्यांनी केले. डॉ. भामरे, दिलीप बोरसे, दादा जाधव, लालचंद सोनवणे, महेंद्र शर्मा, महेश देवरे, अण्णासाहेब सावंत, अरविंद सोनवणे, रासपचे महेंद्र अहिरे, साहेबराव सोनवणे यांनीही आपले विचार मांडले. यावेळी कॉँग्रेसचे नगरसेवक पोपट अहिरे यांनी भाजपत प्रवेश केला.शरद पवार म्हणजे शोलेतील जेलरपंधरा वर्षांच्या आघाडीच्या काळात जेवढी कामे झाली नाही त्याच्या दुपटीने गेल्या पाच वर्षांत कामे झाली. हे जनतेने अनुभवले म्हणूनच जनताजनार्दनाने कॉँग्रेस-राष्ट्रवादीची वाईट अवस्था केली. आज शरद पवार यांची अवस्था शोले सिनेमातील जेलरसारखी झाली आहे, अशी टीकाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019baglan-acबागलाण