शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयाच्या सक्शन युनिटमध्ये स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 01:37 IST

येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील मुख्य इमारतीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या जनरेटर रूममधील सक्शन कॉम्प्रेसर यंत्रणेत अचानकपणे स्फोट झाल्याने काही काळ  घबराट निर्माण झाली होती. मात्र तांत्रिक पथकासह अग्निशमनच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत यंत्रणेतील बिघाड दुरुस्त केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

ठळक मुद्देकाळजात धस्स : तातडीचे प्रयत्न यशस्वी

नाशिक : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील मुख्य इमारतीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या जनरेटर रूममधील सक्शन कॉम्प्रेसर यंत्रणेत अचानकपणे स्फोट झाल्याने काही काळ  घबराट निर्माण झाली होती. मात्र तांत्रिक पथकासह अग्निशमनच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत यंत्रणेतील बिघाड दुरुस्त केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.जिल्हा रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर असलेल्या नवजात शिशूंच्या स्पेशल न्यू बॉर्न केअर युनिट अर्थात चिमुकल्यांच्या अतिदक्षता विभागाशी संबंधित ही यंत्रणा आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या काळजात धस्स झाले. त्यामुळे सर्वत्र धावपळ उडाली. सक्शन यंत्राचे पाइप अचानक फुटल्याने मोठा आवाज झाला. तत्काळ खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. यावेळी जनरेटर रूमला कुलूप लावलेले होते आणि ज्या ठेकेदाराकडे याची जबाबदारी आहे, त्याने नेमलेले तंत्रज्ञ ही येथून गायब होते. जिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद येऊ लागले. n घटनास्थळी पोहोचलेल्या जवानांनी कुलूप तोडत आतमध्ये प्रवेश केला. यावेळी पाईप कपलिंगमधून तुटल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आवाज झाला. जवानांनी तत्काळ हे फुटलेले पाईप बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात यश आले. यामुळे कक्षातील वैद्यकीय सेवेवर परिणाम झालेला नाही. सेवा सुरळीत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. या पाईपचा ऑक्सिजन पाईपलाईनशी संबंध नसल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकhospitalहॉस्पिटल