शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

भगूरच्या दुकानफोडीचा उलगडा; चौघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:38 IST

आठ महिन्यांपूर्वी भगूरच्या शिवाजी चौकातील जिजामाता संकुल येथील पूजा इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे शटर तोडून केलेल्या दुकानफोडीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असून, नाशिकरोड पोलिसांकडून सुरू असलेल्या एका तपासात संशयावरून ताब्यात घेतलेल्या चौघा संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

भगूर : आठ महिन्यांपूर्वी भगूरच्या शिवाजी चौकातील जिजामाता संकुल येथील पूजा इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे शटर तोडून केलेल्या दुकानफोडीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असून, नाशिकरोड पोलिसांकडून सुरू असलेल्या एका तपासात संशयावरून ताब्यात घेतलेल्या चौघा संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.२२ आॅक्टोबर २०१८ रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानातील किमती टीव्ही चोरून नेल्याची तक्रार दुकानाचे मालक सुमित दत्तात्रय चव्हाण यांनी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनला दिली होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकरोड येथील एका चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना मिळालेल्या गुप्त खबरीच्या आधारे रेल्वे स्टेशनजवळ फिरणाऱ्या चौघा संशयितांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी भगूरच्या पूजा इलेक्ट्रॉनिक्स दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी विशाल जयंती बुटिया (२२) रा. विदान्ता रो. हाऊस मखमलाबाद पंचवटी; रवी विठ्ठल घोडके (२५) रा. एरिगेशन कॉलनी, मखमलाबाद; अजय विठ्ठल घोडके (२०) रा. एरिगेशन कॉलनी, मखमलाबाद; सचिन प्रभाकर जाधव (२६) रा.भगूर या चौघांना अटक केली आहे.मुद्देमाल जप्तचोरट्यांकडून एलईडी टीव्ही जप्त करण्यात आले आहेत़ सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक व्ही. ए. शेळके, हवालदार प्रकाश भालेराव, समाधान वाजे, विशाल कुवर, राजेंद्र जाधव आदींनी पार पाडली.

टॅग्स :Policeपोलिसtheftचोरी