शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

वसाकाच्या ऊस उत्पादकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे कैफियत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 13:32 IST

लोहोणेर : वसंतदादा सहकारी साखर कारखान्याला सन २०१८-१९ या चालू गळीत हंगामासाठी पुरवठा केलेल्या उसाची किमान आधारभूत किंमत थकवल्यामुळे वसाका कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक परेशान झाले असून, गत तीन-चार महिने उलटले तरी पहिली उचलही धाराशिव कारखाना प्रशासन अदा करू न शकल्यामुळे संतप्त झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपली कैफियत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन मांडली.

लोहोणेर : वसंतदादा सहकारी साखर कारखान्याला सन २०१८-१९ या चालू गळीत हंगामासाठी पुरवठा केलेल्या उसाची किमान आधारभूत किंमत थकवल्यामुळे वसाका कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक परेशान झाले असून, गत तीन-चार महिने उलटले तरी पहिली उचलही धाराशिव कारखाना प्रशासन अदा करू न शकल्यामुळे संतप्त झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपली कैफियत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन मांडली. दोन-तीन महिने होउनही धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष ऊस उत्पादकांच्या हक्काच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असून, अनेक विनंती अर्ज करूनही उपयोग होत नसल्याने व धाराशिव कारखान्याने दिलेले धनादेश वटत नसल्याने शेवटचा उपाय म्हणून येत्या सात दिवसांत थकीत ऊस बिलाची रक्कम अदा झाली नाही तर धाराशिव कारखान्याच्या चेअरमनसह व्यवस्थापनावर गुन्हे दाखल केले जातील याची जाणीव करून देण्यासाठी वसाका कार्यक्षेत्रासह निफाड, चाळीसगाव, पिळखोड, नवापूर, साक्र ी, विसरवाडी येथील शेकडो ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यावेळी कसमादे ऊस उत्पादक संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, कारखान्याचे माजी संचालक यशंवत पाटील, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, कैलास बोरसे, भास्कर सुकदेव निकम, लक्ष्मण बोरसे,दिलीप निकम, ईश्वर निकम, संजय निकम, दादाजी निकम, पोपट निकम आदी ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.------------------शेतकऱ्यांचा हिशेब देण्याचा आदेशकारखान्याचे माजी उपाध्यक्ष शांताराम जाधव, मोहन जाधव, सुधाकर निकम, वसंतराव पाटील आदींनी चर्चेत भाग घेऊन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तत्काळ दखल घेत निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना सूचना देऊन ज्या ज्या शेतकºयांनी वसाकाला ऊस पुरवठा केला त्याच्या उसाचे वजन व त्या अनुषंगाने होणारी एफआरपीची रक्कम याचा हिशेब त्वरित ऊस उत्पादकांना द्यावा, असे आदेश दिले.

 

टॅग्स :Nashikनाशिक