शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
4
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
5
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
6
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
7
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
8
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
9
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
10
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
11
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
12
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
13
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
14
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
15
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
16
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
17
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
18
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
19
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

सिंगल यूज प्लॅस्टिकची व्याख्या स्पष्ट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 23:52 IST

नाशिक : प्लॅस्टिकबंदी कायद्यात एकदाच वापराच्या (सिंगल यूज) प्लॅस्टिक याविषयी संकल्पना स्पष्ट नसल्याने पुन्हा एकदा प्लॅस्टिकबंदी संदर्भात प्लॅस्टिक उद्योजक आणि व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे सरकारने बंदीविषयीच्या तरतुदी विधानसभेत स्पष्ट केल्या असल्या तरी कायद्यात सिंगल यूज प्लॅस्टिकची स्पष्ट व्याख्या नसल्याने अंमलबजावणी करणाºया अधिकाऱ्यांकडून व्यापारी उद्योजकांना विनाकारण त्रास होत असल्याचा आरोप व्यापारीवर्गातून होत असून, सिंगल यूज प्लॅस्टिकविषयी कायद्यातील संकल्पना स्पष्ट करण्याची मागणी व्यापारीवर्गाकडून होत आहे.

ठळक मुद्देराज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, ग्रामीण भाग प्लॅस्टिकमुक्त बनविण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.

संडे अँकर । व्यापारीवर्गातून मागणी : कायद्यात नेमकी संकल्पना नसल्याने संभ्रम

 

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : प्लॅस्टिकबंदी कायद्यात एकदाच वापराच्या (सिंगल यूज) प्लॅस्टिक याविषयी संकल्पना स्पष्ट नसल्याने पुन्हा एकदा प्लॅस्टिकबंदी संदर्भात प्लॅस्टिक उद्योजक आणि व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे सरकारने बंदीविषयीच्या तरतुदी विधानसभेत स्पष्ट केल्या असल्या तरी कायद्यात सिंगल यूज प्लॅस्टिकची स्पष्ट व्याख्या नसल्याने अंमलबजावणी करणाºया अधिकाऱ्यांकडून व्यापारी उद्योजकांना विनाकारण त्रास होत असल्याचा आरोप व्यापारीवर्गातून होत असून, सिंगल यूज प्लॅस्टिकविषयी कायद्यातील संकल्पना स्पष्ट करण्याची मागणी व्यापारीवर्गाकडून होत आहे.महाराष्ट्राच्या ६०व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून एकदाच वापरता येण्याजोग्य (सिंगल यूज) प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा सरकारचा मानस असल्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी (दि.२८) विधान परिषदेत स्पष्ट करतानाच राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, ग्रामीण भाग प्लॅस्टिकमुक्त बनविण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.सरकारने प्लॅॅस्टिकबंदी केली असली तरी यात लोक सहभाग महत्त्वाचा असून, प्लॅस्टिकचे घातक परिणाम लक्षात घेता एकल वापराच्या प्लॅस्टिकपासून मुक्ती मिळविण्याच्या चळवळीमध्ये लोकांनी जास्तीत जास्त सहभागी होणे अपेक्षित आहे. परंतु, सर्वसामान्य ग्राहकांसह प्लॅस्टिक व्यापारी व उद्योजकांमध्येही सिंगल यूज प्लॅस्टिकविषयी संभ्रम असून, कायद्यात स्पष्ट व्याख्यान नसल्याने अंमलबजावणी करणाºया अधिकाºयांकडून व्यापारी उद्योजकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे सरकारने १८ जून २०१८ रोजी केलेल्या प्लॅस्टिक बंदीनंतर समोर आले होते. त्यामुळे व्यापारीवर्गातून सिंगल यूज प्लॅस्टिकची व्याख्या स्पष्ट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.पर्याय नसलेल्या प्लॅस्टिकला सवलतमहाराष्ट्रात २३ जून २०१८ रोजी प्लॅस्टिक व थर्माकॉल बंदीचा कायदा करण्यात आला. मात्र, बंदी असतानाही त्याची योग्य अंमलबजावणी केली जात नाही. प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कारण बंदीनंतरही प्लॅस्टिकला योग्य पर्याय उपलब्ध करून देण्यात यश आले नाही. परंतु, सरकारे पुन्हा एकदा बंदीचा प्लॅस्टिक बंदीचा फास आवळण्याची तयारी केली असून, त्यानुसार हॅण्डल असलेल्या कोणत्याही मायक्रॉनच्या प्लॅस्टिक पिशव्यांसह प्लॅस्टिक अथवा थर्माकॉलच्या ताट, वाटी, चमच्या, स्ट्रॉ, कप बंद करण्यात आले आहेत, मात्र प्लॅस्टिक खुर्च्या, इंडस्ट्रियल पॅकेजिंगसह अन्य पर्याय उपलब्ध नसलेल्या प्लॅस्टिकवर बंदी नसल्याचे सरकाने स्पष्ट केले आहे.सरकारने केवळ सिंगल यूज प्लॅस्टिक म्हणजे हॅण्डल, लूप अथवा सेल्फ हॅण्डल असलेल्या पिशव्यांसह प्लॅस्टिक किंवा थर्माकॉलच्या ताट, वाटी, चमच्या, स्ट्रॉ, कपवर बंदीचा निर्णय घेतला असून, प्रायमरी पॅकिंग आणि इंडस्ट्रियल पॅकिंगच्या प्लॅस्टिकवर बंदी नसल्याचे पर्यावरणमंत्री यांनी सभागृहात स्पष्ट केले आहे. त्यामुळे या बंदीविषयी संभ्रम असण्याचे काहीच कारण नाही.- कृष्णकांत पोद्दार, प्लॅस्टिक व्यापारी, नाशिक

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीCrime Newsगुन्हेगारी