नाशिक : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांना तेराव्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधी अखर्चित राहिल्याने हा निधी खर्च करण्यास ग्रामविकास विभागाने शासन परिपत्रकान्वये ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०१५च्या परिपत्रकात म्हटले आहे की, तेराव्या वित्त आयोगाचा आतापर्यंत वितरीत केलेल्या सर्व हप्त्यांमधील अखर्चित रक्कम व त्यावर प्राप्त झालेल्या व्याजाची अखर्चित रक्कम शासनाने वेळोवेळी सूचनांनुसार खर्च करण्यास ३१ मार्च २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. १३व्या वित्त आयोगांतर्गत वितरित निधीतून झालेल्या खर्चाचा आढावा घेतला असता आतापर्यंत वितरित केलेल्या निधीतील रक्कम व या वितरित केलेल्या निधीवर प्राप्त व्याजाची काही रक्कम अखर्चित आहे. त्याअनुषंगाने सर्व पंचायत राज संस्थांना नव्याने सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार तेराव्या वित्त आयोगांतर्गत आतापर्यंत वितरित निधीतील अखर्चित रक्कम व त्यावरील प्राप्त व्याजाची अखर्चित रक्कम शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांनुसार खर्च करण्यास ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. अखर्चित रक्कम खर्च करण्यास दिलेल्या या मुदतवाढीनंतर यापुढे कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही, याची नोेंद घ्यावी, असे परिपत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
वित्त आयोगाच्या निधी खर्चास सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
By admin | Updated: April 7, 2015 01:42 IST