शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 22:56 IST

गेल्या पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्यात आले. मात्र पूर्वीच्या ग्रामपंचायत प्रशासनात सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही नगररचना विभागाने सेवेत कायम केले नाही. अनेक वर्षे काम करणाºया कर्मचाºयांना किमान वेतन व १०० टक्के महागाई भत्ता मिळावा यासह विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी प्रांत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

ठळक मुद्देकळवण नगरपंचायत : कर्मचाऱ्यांना किमान वेतन, महागाई भत्ता देण्याची मागणी

कळवण : गेल्या पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्यात आले. मात्र पूर्वीच्या ग्रामपंचायत प्रशासनात सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही नगररचना विभागाने सेवेत कायम केले नाही. अनेक वर्षे काम करणाºया कर्मचाºयांना किमान वेतन व १०० टक्के महागाई भत्ता मिळावा यासह विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी प्रांत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.नगरपंचायतीच्या कर्मचाºयांच्या विविध मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. वेळोवेळी आंदोलने करूनही मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने कर्मचारी संघटनांनी बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनामुळे नागरपंचायतीच्या सेवेवर परिणाम होणार आहे. ग्रामपंचायती बरखास्त करून त्याचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्यात आले. मात्र पूर्वीच्या ग्रामपंचायतीमध्ये सफाई, संगणक आॅपरेटर, पाणीपुरवठा व आदी विभागातील कर्मचारी गेली अनेक वर्षापासून काम करत आहेत. मयत झालेल्या कर्मचाºयाच्या कुटुंबाला सेवानिवृत्तीचा लाभ देण्यात यावा, वारसांना वारसा हक्काने अथवा अनुकंपाखाली नोकरी मिळावी, नागरपंचायतीमधील कर्मचाºयांना सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्रामपंचायतीची सेवा ग्राह्य धरण्यात यावी, सफाई कामगारांचे शासकीय सेवेत समावेशन करावे, तसेच रोजदारी कर्मचाºयांना सेवेत सामावून घेण्यात यावे, तत्कालीन ग्रामपंचायत जे कर्मचारी वसुली कारकून पदावर कार्यरत होते त्यांना नगरपंचायत सेवेत शिपाईपदाचा आदेश देण्यात आलेला आहे. या आंदोलनात कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विक्र म निकम, ताराबाई गोयर, जिजाबाई बस्ते, अशोक अहिरे, संजय आहेर, भाऊराव पगार, रामराव सोनवणे, बापू आहेर, किरण निकम, कैलास पगार, रोशन निकम, रमेश पगार, बेबीबाई बस्ते, उज्ज्वला बस्ते, जीवन सोनवणे, भीमाबाई बस्ते, कमल केदार, सिंधूबाई गोयर, संगीता बस्ते, दगा पगार आदी कर्मचारी बेमुदत आमरण उपोषणात सहभागी झाले आहेत. ग्रामपंचायत व नगरपंचायत सेवा धरून आज २५ वर्षे झाली आहे, जेव्हा ते सेवेत रु जू झाले तेव्हा इयत्ता दहावी उत्तीर्ण असण्याची अट होती. त्यांना लिपिकपदावर घेण्यात यावे व यासह सर्व कर्मचाºयांना किमान वेतन व १०० टक्के भत्ता फरकासह मिळावा या मागण्यांसाठी आज कोल्हापूर फाटा येथील प्रशासकीय इमारतीतील प्रांत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

टॅग्स :GovernmentसरकारStrikeसंप