शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

नगरपंचायतीच्या निर्मितीनंतर बदलाची अपेक्षा

By admin | Updated: November 19, 2015 22:35 IST

देवळा : इमारतीवर ग्रामपालिकेचेच नाव

देवळा : नगरपंचायतीची निर्मिती होऊन नऊ महिने उलटले असताना आणि आठवडाभरात नगराध्यक्षांची निवड होण्याची वेळ आली असताना देवळा नगरपंचायत इमारतीवर ‘देवळा ग्रामपालिका’ असेच नाव झळकत असून प्रशासनाच्या एवढ्या व्यस्त कामकाजाबद्दल नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.देवळा ग्रामपालिकेचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यापासून देवळ्याच्या तहसीलदार शर्मिला भोसले या नगरपंचायतीच्या प्रशासक म्हणून काम पाहत होत्या. त्यांच्या प्रशासकपदाच्या कारकीर्दीत नगरपंचायतीत जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यात सर्वसामान्यांना बांधकामाची परवानगी असो किंवा रस्त्यावरील बंद पडलेले पथदीप सुरू करण्यासाठी येणारा खर्च असो अशी अनेक उदाहरणे देता येतील. गत सहा महिन्यांपासून नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा थकलेला वेतनप्रश्न दिवाळीआधी मार्गी न लागल्याने या कर्मचाऱ्यांची दिवाळी कोरडीच गेली. प्रशासक म्हणून त्या वादग्रस्त ठरल्या. नगरपंचायत निवडणूक झाल्यावर शर्मिला भोसले यांच्या जागी तहसीलदार म्हणून कैलास पवार यांची नियुक्ती करण्यात आली. सहा दिवसांपूर्वीच त्यांनी सूत्रे हाती घेतली. देवळा ग्रामपालिकेऐवजी देवळा नगरपंचायत असा नावात बदल झाला नाही तर इमारतीवर नाव ग्रामपालिकेचे व आत कारभार मात्र नगरपंचायतीचा अशी विसंगती निर्माण होणार आहे. (वार्ताहर)