शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

अपेक्षित ‘साहित्यिक’ अपेक्षाभंग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:06 IST

महामंडळाचे अध्यक्ष ‘स्थळ पाहणी’साठी नाशकात आले असताना त्यांनी ज्या शब्दात उस्मानाबादची पाठराखण केली होती, त्या शब्दांमधूनच ही पाहणी केवळ दिखावा असल्याचा प्रत्यय येत होता. त्यामुळे साहित्य संमेलन हे उस्मानाबादला देण्यात येत असल्याची अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांची घोषणा हा नाशिकच्या साहित्यिक वर्तुळासाठी अपेक्षित अपेक्षाभंग ठरला आहे.

नाशिक : महामंडळाचे अध्यक्ष ‘स्थळ पाहणी’साठी नाशकात आले असताना त्यांनी ज्या शब्दात उस्मानाबादची पाठराखण केली होती, त्या शब्दांमधूनच ही पाहणी केवळ दिखावा असल्याचा प्रत्यय येत होता. त्यामुळे साहित्य संमेलन हे उस्मानाबादला देण्यात येत असल्याची अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांची घोषणा हा नाशिकच्यासाहित्यिक वर्तुळासाठी अपेक्षित अपेक्षाभंग ठरला आहे.गत आठवड्याच्या प्रारंभी ढाले पाटील आणि तथाकथित ‘संमेलन स्थळ पाहणी समिती’ यांनी पाच स्थळांवर जाऊन ‘नाशिक दर्शन’ केले. मराठी साहित्य संमेलन नाशकात भरवायचे की उस्मानाबादला याबाबतचा निर्णय घेण्यासाठी या स्थळ पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करतानादेखील पाटील यांनी नाशिकचे भौगोलिक स्थान, हवामान, जागा, पाणी उपलब्धता या सर्व बाबींपेक्षा आयोजकांकडून कशा प्रकारच्या ‘तयारी’चे आश्वासन मिळते, त्याचा आढावा घेऊनच ‘समिती’ निर्णय घेत असल्याचे सांगितले होते. सध्याच्या दुष्काळजन्य स्थितीत उस्मानाबाद सारख्या सदैव पाणीप्रश्न असणाºया जिल्ह्यात साहित्य संमेलन भरवणे कितपत योग्य ठरेल ? या प्रश्नावर ढाले पाटील यांनी तेथील आयोजकांनी पाण्याबाबत आश्वस्त केले असल्याचे सांगताच संमेलनाचे ‘पाणी’ कोणत्या उताराकडे धावत आहे आणि कुठे मुरणार आहे ? तेच सूचित झाले होते. त्यात महामंडळाचे कार्यालय मराठवाड्यात स्थलांतरित झाले असल्याने हे अपेक्षितच होते.स्वागताध्यक्ष निवडीत पडले उणेनाशिकला आलेल्या स्थळ पाहणी समितीमधील एका सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर नाशिककर ‘भक्कम स्वागताध्यक्ष’ निवडण्यातच कमी पडल्याने नाशिकला स्थळ निवडीत यंदा पसंती मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. ‘सावानाच्या पुढाकाराने सर्व नाशिककरांचे संमेलन’ ही कल्पना ऐकायला रम्य वाटत असली तरी ‘संमेलन भरवणे’ नामक बाजारात ती पिछाडीवर पडणारी असते, अशी सूचनादेखील केली.नाशिकच्या पाहणी दौºयात अध्यक्षांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र, नाशिकमध्ये दोनवेळा संमेलन झाले असून, मागील संमेलन १३ वर्षांपूर्वीच झाले आहे, तर उस्मानाबादला अद्याप एकदादेखील संमेलन झालेले नाही. त्यामुळे पोट भरलेल्याला पुन्हा द्यायचे की उपाशी असलेल्याला त्याबाबत त्यांनी घेतलेला निर्णय अयोग्य म्हणता येत नाही.- किशोर पाठक, उपाध्यक्ष, सावाना

टॅग्स :literatureसाहित्यNashikनाशिक