शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांना प्रत्यक्ष भरपाईची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 01:39 IST

गोदावरीला आलेला महापूर आणि सातत्याने होणाऱ्या पावसामुळे परिसरातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, मोहगाव, बाभळेश्वर, जाखोरी, हिंगणवेढा, लाखलगाव या ठिकाणी अनेकांचे नुकसान झाले. शेकडो एकर जमिनीतील पिकांचे नुकसान झाले, तर अनेकांची घरे जमीनदोस्त झाली.

एकलहरे : गोदावरीला आलेला महापूर आणि सातत्याने होणाऱ्या पावसामुळे परिसरातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, मोहगाव, बाभळेश्वर, जाखोरी, हिंगणवेढा, लाखलगाव या ठिकाणी अनेकांचे नुकसान झाले. शेकडो एकर जमिनीतील पिकांचे नुकसान झाले, तर अनेकांची घरे जमीनदोस्त झाली.या सर्व परिस्थितीचे पंचनामे करण्यासाठी गावोगावी तलाठी, सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी बांधाबांधावर व घरोघरी जाऊन पंचनामे करण्यास सुरुवात केलेली आहे.दरम्यान, पूरग्रस्तांना प्रत्येकी १० किलो गहू व १० किलो तांदूळ आपापल्या भागातील स्वस्त धान्य दुकानातून देण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. जुने सामनगावातील २३ पूरग्रस्त कुटुंबांना पंचनामे केल्यानंतर त्यांना धान्याचे वाटप करण्यात येत आहे. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे तलाठी चौधरी, कृषी सहायक विद्या फुसे, उपसरपंच सचिन जगताप, ग्रामसेवक बापू पवार या पथकाकडून करण्यात येत आहेत.कोटमगाव येथे सरपंच बाळासाहेब म्हस्के, कृषीमित्र पोपट म्हस्के, कारभारी घुगे, तलाठी चौधरी यांनी पंचनामे केले.जाखोरी येथे तलाठी किशोर बाचकर, कृषी सहायक रणजित आंधळे, ग्रामसेवक उत्कर्ष पाटील, सरपंच सुनीता कळमकर, विश्वास कळमकर, उपसरपंच अशोक धात्रक यांनी पंचनामे केले.दरम्यान, हिंगणवेढे येथे अजूनही पंचनामे सुरू झाले नसल्याचे सरपंच अनिता धात्रक यांचे चिरंजिवविक्र म धात्रक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.बाभळेश्वर येथे ग्रामसेवक ज्ञानेश्वर भोर, सरपंच मंगल पगारे, उपसरपंच सिंधू टिळे, तलाठी यांनी नुकसानग्रस्त शेती व घरांचे पंचनामे केले. लाखलगाव येथे ग्रामसेवक के. एम. बरु , तलाठी मनीषा पाटील, सरपंच स्वाती हिले, उपसरपंच यांनी पंचनामे केले.दारणेचा रौद्रावतार ५ ते ७ तारखेपर्यंत भयंकर होता. पाणी क्षणाक्षणाला वाढत जाऊन घरात शिरले तेव्हा मात्र तारांबळ उडाली. काय करावे सुचेना. अशावेळी सरपंच मंगल पगारे, ग्रामसेवक ज्ञानेश्वर भोर, उपसरपंच सचिन टिळे, सुरेश टिळे, दत्तू टिळे, दत्तू पगार यांनी शाळेमध्ये स्थलांतरित केले. पूर कमी होईपर्यंत जेवण आणि कपड्यांची व्यवस्था केली.-संजय हांडगे, मोहगावदोन दिवस आमच्या घराला दारणेच्या पूर पाण्याचा वेढा होता. घरातील धान्य, सामान वाहून गेले. कांद्याच्या चाळीत पाणी शिरल्याने काही प्रमाणात कांदा वाहून गेला. शिल्लक राहिलेल्या कांद्याचा उग्र वास येऊ लागला व कोंबही फुटले. -दशरथ कटाळे, जुने सामनगावगेल्या १५ वर्षांतील यंदा दारणेच्या पुराचा उच्चांक होता. नदीतील वाळू उपसा मोठ्या प्रमाणात झाल्याने पात्र मोठे झाले आहे. बाभळेश्वरच्या बाजूने किनारा संपूर्ण मातीयुक्त असल्याने मोठ्या प्रमाणात खचला आहे. त्यामुळे पुराचा प्रवाह वेगाने शेतात व घरामध्ये शिरला. रात्रीच्या वेळी पाणी शिरल्याने अंदाज आला नाही अन् त्यामुळे धावपळ झाली. घरातील फर्निचर, भांडे, कपडे, जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. पाण्यामुळे भिंती पडल्या, सामान वाहून गेले. संसार उभा कसा करावा ही चिंता सतावते आहे. पूरपरिस्थिती होती आमची राहण्याची सोय ग्रामस्थांनी केली होती. नुकसानभरपाई मिळावी. - रेणुका धुळे, लाखलगाव

टॅग्स :floodपूरNashikनाशिक