शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पुढील महिन्यात होणार मंत्रिमंडळ विस्तार : रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:47 IST

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील महिन्यात केला जाणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी दिली.मंत्रिमंडळात नाशिककरांना संधी देण्याबाबत विचार करण्याचे सुतोवाचही त्यांनी केले.

नाशिक : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील महिन्यात केला जाणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी दिली.मंत्रिमंडळात नाशिककरांना संधी देण्याबाबत विचार करण्याचे सुतोवाचही त्यांनी केले.  पक्षाच्या कार्यालयातील पत्रकार परिषदेत सोमवारी (दि.२३) दानवे यांनी ही माहिती दिली. रावसाहेब दानवे म्हणाले, नाशिक शहरातील करवाढीच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. याबाबत लवकरच बैठक होणार आहे. परंतु, नाशिककर त्रस्त असलेल्या करवाढीच्या मुद्द्यावर कोणतेही ठोस आश्वासन न देता या प्रश्नावर मौन बाळगण्याची भूमिका दानवे यांनी घेतली. दरम्यान, मे महिन्यात राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता असून, यावेळी नाशिकचाही विचार केला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. भाजपा महाराष्ट्रातही गुजरातच्या धर्तीवर पक्षाची बांधणी करणार असून, ८० हजार बूथ प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक बूथवर २५ युवकांची नेमणूक करण्यात येणार असून, त्यांच्यावर मतदार यादीचे समोरील व मागच्या बाजूला असलेल्या ६० मतदारांची जबाबदारी सोपविण्यात येणार असून, या युवकांना पेजप्रमुख म्हणून संबोधण्यात येणार असल्याची माहितीही दानवे यांनी दिली. यावेळी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, प्रवक्ते सुहास फरांदे, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, राहुल अहेर, संघटनमंत्री किशोर काळकर, ओबीसी अध्यक्ष विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष दादा जाधव आदी उपस्थित होते.प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठापक्षाने सरपंच पदापासून केंद्रीय मंत्री आणि आता प्रदेशाध्यक्षासारखी महत्त्वाची पदे सोपविली आहेत. त्यामुळे आपल्याला कोणत्याही पदाची अपेक्षा नसल्याचे बोलून दाखवतानाच पक्षाचा प्रदेशाध्यक्ष हा मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठा असल्याचे सांगत रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षांसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा राज्य सरकारवर अंकुश असल्याचे अप्रत्यक्षरीत्या स्पष्ट के ले.युतीबाबत चर्चा नाहीशिवसेनेसोबत युतीविषयी अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. भाजपा संघटनात्मक विचारधारेचा पक्ष असून युतीसारखा महत्त्वाचा निर्णय कोणताही एक नेता घेऊ शकत नाही. त्यामुळे युतीची चर्चा करण्यासाठी जाणार असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारल्याचे वृत्त केवळ माध्यमांनी तयार केले असून, सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांची वेळच मागितली नसल्याचा खुलासा रावसाहेब दानवे यांनी केला.

टॅग्स :BJPभाजपा