शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

अनावश्यक गर्दीवर पोलिसांकडून रस्ता बंदीचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:15 IST

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहे. कडक निर्बंध शासनाने ...

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहे. कडक निर्बंध शासनाने घातले असले तरीदेखील रविवार कारंजा ते थेट रामसेतू पुलापर्यंतच्या परिसरात दररोज सकाळी नागरिकांची गर्दी उसळत होती. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे या भागात वाहतूक कोंडी होऊन वर्दळ अधिकाधिक रेंगाळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यानंतर पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी अधिसूचना काढत या भागात वाहनांना प्रवेशास मज्जाव केला आहे. तशी अधिसूचना काढली असून या अधिसूचनेची अंमलबजावणी पोलिसांकडून केली जात आहे.

या नव्या उपाययोजनेमुळे या भागातील अनावश्यक गर्दी नियंत्रणात आणणे शक्य होत असल्याचे चित्र गुरुवारी (दि. ६) पाहावयास मिळाले. मात्र ‘सोशल डिस्टन्स’ यावेळी राखला जात नसल्याचे दिसून येते. शासनाने भाजीपाला, किराणा माल, दूध, दुग्धजन्य पदार्थ विक्रीला जीवनावश्यक म्हणून परवानगी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत देण्यात आली आहे. या कालावधीत अन्य कुठल्याही प्रकारच्या दुकानांना व्यवसाय करण्यास परवानगी नसल्याचे शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे सकाळी ७ ते ११ या वेळेत भाजी व किराणा खरेदीसाठी उडणारी झुंबड चिंता वाढविणारी आहे. ग्राहकांना दुकानांपर्यंत वाहने नेण्यास मज्जाव केल्यास सुरक्षित वावर राखता येईल या उद्देशाने पोलिसांनी बाजारपेठेतील रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. पुढील ११ दिवस रविवार कारंजा भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी बुधवारी सकाळपासून सुरू करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी ग्राहकांना नव्या निर्बंधांची माहिती नसल्याने गोंधळ उडाला. अनेक जण दुचाकी, चारचाकीसह बाजारपेठेत प्रवेश करत होते. यामुळे वाहतूक कोंडी झाली; मात्र गुरुवारी बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याने वाहनांची कोंडी झाली नाही. दरम्यान, भद्रकाली, तेलीगल्ली, दूध बाजार या ठिकाणी मात्र वाहतूक सुरूच राहत असल्याने गर्दी आणि वाहतूक कोंडी सकाळी होत आहे.

----इन्फो----

या मार्गांवर वाहनांना ‘नो एन्ट्री’

-रविवार कारंजा-बोहरपट्टी कॉर्नर-सोन्या मारुती चौक-सराफ बाजार, भांडी बाजार-रामसेतू पुलापर्यंतचा परिसर (वेळ: सकाळी ७ ते ११)

---

- रविवार कारंजामार्गे गोरेराम गल्लीतून सराफ बाजाराकडे जाणारा रस्ता वाहनांसाठी दररोज सकाळी चार तास बंद

-

----- इन्फो----

वाहतुकीचा पर्यायी मार्ग असा...

भद्रकाली सारस्वत नाल्यापासून दहीपूल साक्षी गणेश मंदिर रस्ता

- रविवार कारंजा- रेडक्रॉस सिग्नल- शालिमार- गंजमाळ सिग्नलमार्गे दूधबाजार, सारडा सर्कल

- सूर्यनारायण मंदिर- अहल्यादेवी होळकर पुलावरून थेट पंचवटी कारंजा- शनि गल्ली मार्गे गाडगे महाराज पुलावरून दहीपूल.

----

वाहन पार्किंगची व्यवस्था

- बोहरपट्टी कॉर्नर ते धुमाळ पॉइंट

- गोदावरी घाट व गाडगे महाराज पुलाखालील परिसर