शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रदर्शनातील गणरायाच्या विविध रूपांची भक्तांना मोहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 00:08 IST

गीतकार यशवंत देव यांनी ‘कोटी कोटी रुपे तुझी...’ या भक्तिगीतातून वर्णिलेल्या महिमेनुसार श्री गणरायाची नानाविध रूपे, अवतार नाशिककरांसमोर चित्राकृतींच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत. गणरायाच्या विविध रूपांनी गणेशभक्तांना मोहिनी घातली आहे.

नाशिक : गीतकार यशवंत देव यांनी ‘कोटी कोटी रुपे तुझी...’ या भक्तिगीतातून वर्णिलेल्या महिमेनुसार श्री गणरायाची नानाविध रूपे, अवतार नाशिककरांसमोर चित्राकृतींच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत. गणरायाच्या विविध रूपांनी गणेशभक्तांना मोहिनी घातली आहे.  निमित्त आहे, गणेशोत्सवानिमित्त चित्रकला महाविद्यालयातील प्राध्यापक दीपक वर्मा यांनी रेखाटलेल्या गणरायांच्या विविध अवतार व ताम्रपत्रावरील रूपांच्या चित्रप्रदर्शनाचे. गंगापूररोडवरील हार्मनी कलादालनात श्री गणेश चित्रमाला प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. हे चित्रप्रदर्शन येत्या शुक्रवारपर्यंत (दि.२१) संध्याकाळी ५ ते रात्री ९ यावेळेत सर्व गणेशभक्तांसाठी मोफत खुले राहणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. उद्घाटनप्रसंगी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, वैशाली जैन, विजयन सोहोनी, अ‍ॅड. मृणालिनी खैरनार, रघुनाथराव कुलकर्णी, बाळ नगरकर आदी उपस्थित होते.  या चित्रप्रदर्शनात एकूण ३० कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. यामध्ये काही चित्राकृती तर काही ताम्रपत्रावर कोरलेली गणरायांची विविध रूपे आहेत. रेषांवर विशेष प्रभुत्व असलेल्या वर्मा यांनी प्रामुख्याने गणरायाचा बालाजी अवतार, सरस्वती अवतार, पंचमुखी हनुमान अवतार, दत्तमुखी अवतार आपल्या कुंचल्यातून रेखाटले आहेत. लक्षवेधी रंगसंगती, अलंकारिक-सृजनशील मांडणी हे या चित्रांचे वैशिष्ट्य आहेत. प्रदर्शित करण्यात आलेल्या चित्राकृतींमधील गणरायांच्या विविध रूपे बोलकी वाटतात.  गणेशोत्सवामध्ये नाशिककरांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या ााडक्या बाप्पांची विविध रूपे न्याहाळण्याची संधी मिळाली असून नाशिककर गणेशभक्तांनी उद्घाटनाच्या दिवशी गणरायांची चित्ररूपे न्याहाळण्यासाठी गर्दी केली होती.

टॅग्स :ganpatiगणपतीartकला