शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

व्यायाम, मन:शांतीद्वारे निरोगी जीवन : रश्मी सोमाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:10 IST

नाशिक : प्रदूषण, ताणतणाव, कमी दर्जाचे अन्न या गोष्टींमुळे मानवी आरोग्य धोक्यात येत आहे. या गोष्टी शरीरातील पेशींना मारक ठरत असून, या गोष्टींपासून शरीराचा बचाव करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन आहारतज्ज्ञ रश्मी सोमाणी यांनी केले. महेशनवमीनिमित्त माहेश्वरी समाजाच्या वतीने ‘निरोगी जीवनाचा मूलमंत्र’ या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. टिळकवाडीतील ...

नाशिक : प्रदूषण, ताणतणाव, कमी दर्जाचे अन्न या गोष्टींमुळे मानवी आरोग्य धोक्यात येत आहे. या गोष्टी शरीरातील पेशींना मारक ठरत असून, या गोष्टींपासून शरीराचा बचाव करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन आहारतज्ज्ञ रश्मी सोमाणी यांनी केले. महेशनवमीनिमित्त माहेश्वरी समाजाच्या वतीने ‘निरोगी जीवनाचा मूलमंत्र’ या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. टिळकवाडीतील माहेश्वरी विद्यार्थी भवन येथे बुधवारी (दि.२०) हा कार्यक्रम पार पडला.सोमाणी पुढे म्हणाल्या, सकाळी उठल्या उठल्या चहा न पिता पाणी व एखादे त्या त्या मोसमातील फळ खावे. त्यानंतर अर्ध्या तासाने नाष्टा व चहा घ्यावा. नाष्टा ताजा हवा. २१ दिवस असा सराव केल्यास शरीराला त्याची सवय लागेल. मानवी शरीरात चांगले व वाईट दोन्ही प्रकारचे जिवाणू असतात. रात्रभर तोंडात चांगले जिवाणू जमा झालेले असतात. त्यामुळे पाणी पिऊन, फळे खाऊन ते जिवाणू शरीरात जाऊ द्यावे. उठल्या उठल्या ब्रश करू नये. पोटाचा वाढता घेर या सर्वांना सतावणाऱ्या समस्येवर उपाय सांगताना वेळ मिळेल तेव्हा कपालभाती करण्याचा सल्ला देण्यात आला. श्वास घेणे व सोडणे असा व्यायाम करीत पोटाचा आकार स्थिर राखू शकता. पायी चालण्यावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शिल्पा हरकुट यांनी सूत्रसंचालन केले.आरोग्याच्या अनेक समस्यांचे मूळ कमी पाणी पिणे हे असून, प्रत्येकाने दिवसभरात भरपूर पाणी पिणे महत्त्वाचे आहे. दररोेज कुठल्याही प्रकारचा किमान ४५ मिनिटे व्यायाम करावा, ताठ बसावे, ताठ उभे रहावे. पोश्चर फार महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Nashikनाशिक