शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वगळलेली कामे अंदाजपत्रकात समाविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 02:12 IST

महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी आयुक्तांनी सादर केलेल्या १७८५.१४ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात ११५ कोटी रुपयांची भर घालत १९००.१५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीने शनिवारी (दि.३१) झालेल्या विशेष अंदाजपत्रकीय सभेत महापौरांना सादर केले. दरम्यान, आयुक्तांनी स्थायीने सुचविलेली वाढ अमान्य करत स्थायीच्या अंदाजपत्रकाची हवा काढून घेतली असताना महापौरांनी मात्र, मंजूर असलेली परंतु आयुक्तांनी वगळलेली सुमारे १३२ कोटी रुपयांची कामे पुन्हा अंदाजपत्रकात समाविष्ट करत दणका दिला.

नाशिक : महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी आयुक्तांनी सादर केलेल्या १७८५.१४ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात ११५ कोटी रुपयांची भर घालत १९००.१५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीने शनिवारी (दि.३१) झालेल्या विशेष अंदाजपत्रकीय सभेत महापौरांना सादर केले. दरम्यान, आयुक्तांनी स्थायीने सुचविलेली वाढ अमान्य करत स्थायीच्या अंदाजपत्रकाची हवा काढून घेतली असताना महापौरांनी मात्र, मंजूर असलेली परंतु आयुक्तांनी वगळलेली सुमारे १३२ कोटी रुपयांची कामे पुन्हा अंदाजपत्रकात समाविष्ट करत दणका दिला.  स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी अहेर यांनी महापौर रंजना भानसी यांच्याकडे स्थायी समितीने तयार केलेले १९००.१५ कोटींचे आणि १८९९.७४ कोटी रुपये अपेक्षित खर्च असलेले ४१ लाखांचे अंदाजपत्रक सुपूर्द केले. यावेळी, हिमगौरी अहेर यांनी सांगितले, शहराच्या विकास कामांकरिता मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच नागरिकांवर अतिरिक्त बोजा पडू नये, याची काळजी अंदाजपत्रकात घेण्यात आली आहे. महापालिकेचे नियमितपणे कर भरणाऱ्या नागरिकांसाठी प्रोत्साहनात्मक योजना म्हणून त्यांचा दोन लाख रुपयांचा विमा काढण्यात येणार असून, त्यासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. शहरात अ‍ॅटोमॅटिक पद्धतीने चालणारे ई-टॉयलेट पीपीपीद्वारे उभारणी करण्यात येणार आहेत. सहाही विभागात प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येकी दहा युनिट उभारले जाणार आहेत. माणिकनगर येथे आंतरराष्टय दर्जाचे बॅडमिंटन आणि टेबलटेनिस, स्केटिंग कोर्ट उभारले जाणार आहे. त्यासाठी दोन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, शहरातील २९ प्रभागांकरिता प्रत्येकी तीन कोटी, तर उर्वरित दोन प्रभागांकरिता २.२५ कोटी याप्रमाणे प्रभाग विकास निधी दिला जाणार असून, त्यासाठी ९१.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. याशिवाय, शहराच्या जलद विकासासाठी परिवहन सेवा, अडथळामुक्त रस्ते व पदपथ, एलइडी दिवे बसवून ऊर्जा बचत करणे, गोदावरी, नंदिनी तसेच वाघाडी नद्यांचे सुशोभिकरण करणे आदी कामे प्रामुख्याने, वर्षभरात पूर्ण करण्याचा संकल्पही सभापती हिमगौरी अहेर यांनी केला. सुमारे नऊ तास चाललेल्या या विशेष अंदाजपत्रकीय सभेत ४७ सदस्यांनी विविध सूचना मांडल्या. त्यात प्रामुख्याने, गेल्या वर्षी प्रभाग समित्यांसह महासभेवर मंजूर झालेल्या परंतु, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रद्दबातल ठरविलेल्या कामांचा अंतर्भाव अंदाजपत्रकात करण्याची मागणी सदस्यांनी केली. याशिवाय, मागील वर्षी नगरसेवक निधीतील कामेही थांबविण्यात आल्याने रोष व्यक्त करत त्यांना चालना देण्याची सूचना केली. पाणीपुरवठ्यापासून ते ड्रेनेजलाइनपर्यंतच्या समस्यांचाही सदस्यांनी ऊहापोह केला. सदस्यांनी सूचनांचा वर्षाव केल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तब्बल पावणेदोन तास भाषण करत सभागृहात सदस्यांनी मांडलेले मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. स्थायी समितीने सुचविलेली वाढ कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नसल्याने आयुक्तांचेच अंदाजपत्रक मंजूर करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु, महापौर रंजना भानसी यांनी गेल्या वर्षी नागरिकांच्या मागणीनुसार नगरसेवकांनी सुचविलेली परंतु नंतर आयुक्तांनी वगळलेली सुमारे १३२ कोटी रुपयांची कामे पुन्हा अंदाजपत्रकात समाविष्ट करत सन २०१८-१९च्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली.  गेल्या काही दिवसांत विविध निर्णयांमुळे आयुक्त आणि लोकप्रतिनिधी यांच्यात वाढत चाललेली दरी तसेच विसंवाद याबाबतही सभागृहात पडसाद उमटले. गुरुमित बग्गा यांनी सांगितले, तुकाराम मुंढे यांच्या कामकाजाबद्दल कुणालाही आक्षेप नाही. त्यांनी नाशिकला चार वर्षे राहून रेकॉर्ड करावे. परंतु, त्यासाठी लोकप्रतिनिधींशी मिळतेजुळते घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला, तर मनसेचे गटनेता सलीम शेख यांनी महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी सदस्यांशी सुसंवाद साधण्याची गरज असल्याचे सांगितले. प्रतिभा पवार यांनीही आपल्या शैलित भाषण करत नगरसेवकांच्या व्यथा मांडल्या आणि आयुक्तांना ‘महाबली’ची उपमा देतानाच महापौर या आमच्या ‘सीतामैया’ असल्याचे सांगितले.बससेवेला  विरोधकांचा विरोधआयुक्तांनी शहर बससेवा महापालिकेने ताब्यात घेण्यासाठी अंदाजपत्रकात सुरुवातीला ३० कोटींची तरतूद केलेली आहे. स्थायी समिती सभापतींनीही शहर बससेवा वर्षभरात ताब्यात घेण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, शहर बससेवा ताब्यात घेण्यास विरोधकांनी विरोध दर्शविला. माजी उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी सांगितले, बससेवा ताब्यात घेण्याइतपत मनपाची स्थिती नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कुठेही फायद्याची नाही. बससेवा महापालिकेने चालवावी, असे कायद्यात कुठेही बांधील कर्तव्य सांगितलेले नाही. आधीच महापालिकेची निधीची ओढाताण होत असताना बससेवा झेपावणार आहे काय, असा सवालही बग्गा यांनी केला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका