नाशिक : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने विजयाची हॅट्ट्रिक साजरी केल्याने मंगळवारी (दि.११) नाशिकमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून, आता लक्ष्य नाशिक महापालिका असा निर्धार व्यक्त केला आहे. पाणीपट्टी माफ, घरपट्टी हाफ अशा प्रकारच्या घोषणादेखील यावेळी देण्यात आल्या आहेत.दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपसारख्या बलाढ्य पक्षाला धूळ चारून आम आदमी पार्टीने बाजी मारली त्यानिमित्ताने महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर आणि सीबीएस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर जल्लोष केला. या जल्लोषात जितेंद्र भाभे, नितीन शुक्ल, जगजित सिंग, गिरीश उगले, एकनाथ सावळे, कुलदीप कौर, सुमित शर्मा, शुभम पडवळ, संतोष राऊत यांच्यासह अन्य कार्यकर्तेे सहभागी झाले होते.
‘आप’चा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 01:14 IST